आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हस्तरेषा :हातावरील या गोष्टीवरून समजू शकते एखाद्या व्यक्तीची नेतृत्त्व क्षमता

3 महिन्यांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • तुमच्या हातावर आहेत का असे चिन्ह, यामुळे कळते व्यक्तीची नेतृत्त्व क्षमता

हस्तरेषा आणि ज्योतिष शास्त्रानुसार हातावरील रेषा आणि बनावट पाहून एखादा व्यक्ती भाग्यशाली आहे किंवा नाही, व्यक्तीचे आयुष्य कसे राहील, व्यक्ती बॉस बनू शकणार की नाही याविषयी समजू शकते. एखाद्या व्यक्तीची नेतृत्त्व क्षमता कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी हातावरील गुरु पर्वताचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गुरु पर्वत इंडेक्स फिंगर(तर्जनी) खाली असतो. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागरनुसार गुरु पर्वताशी संबंधित काही खास गोष्टी...

> गुरु पर्वतावर आडव्या रेषा किंवा रेषांच्या जाळीचे चिन्ह असणे अशुभ राहते. यामुळे गुरु पर्वताचे शुभ फळ कमी होतात.

> गुरु पर्वतावर उभ्या रेषा असतील तर या शुभफळ देतात. या रेषांमुळे व्यक्ती चांगला प्रबंधक बनू शकतो. 

> जास्त उंच असलेला गुरु पर्वत शुभ नसतो. याच्या प्रभावाने व्यक्ती अहंकारी होतो आणि इतरांना जास्त महत्त्व देत नाही.

> गुरु पर्वतावर ताऱ्याचे चिन्ह किंवा रेषांनी तयार केले त्रिशूळ, त्रिकोणाचे चिन्ह असल्यास व्यक्ती उत्तम बॉस बनू शकतो.

> गुरु पर्वतावर खड्डा असल्यास व्यक्तीला भाग्याची मदत मिळत नाही. हे लोक इतरांच्या अधीन राहून काम करतात.

> गुरु पर्वतावर जाळी किंवा डाग असेल तर व्यक्ती कमजोर नेतृत्त्व क्षमता असणारा असतो.

> गुरु पर्वत जास्त उंच दिसत असेल तर असे लोक धर्माच्या बाबतीत कट्टरपंथी असू शकतात.

0