आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधनु राशीत सूर्याच्या आगमनाने बुधादित्य योग तयार झाला आहे. 28 डिसेंबरपर्यंत हा शुभ योग राहील. ज्योतिष विद्वानांच्या मते बुध आणि सूर्य एका राशीत एकत्र आल्यानंतर बुधादित्य योग तयार होतो. या आधी शुक्र देखील धनु राशीत आहे. त्यामुळे बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मीनारायण नावाचा आणखी एक शुभ योग तयार होत आहे. हे दोन मोठे शुभ योग तयार झाल्यामुळे अनेक लोकांच्या नोकरी आणि व्यवसायात मोठे बदल होऊ शकतात. जे आनंददायी असतील.
6 राशींसाठी शुभ
तीन ग्रहांच्या शुभ संयोगामुळे मेष, कर्क, तूळ, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. मालमत्ता आणि आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने वेळ उत्तम राहील. नशीब तुमच्या सोबत असू शकते. कौटुंबिक बाबींसाठीही वेळ शुभ म्हणता येईल.
5 राशींसाठी काळ संमिश्र राहील
तिन्ही ग्रहांच्या संयोगामुळे वृषभ, मिथुन, सिंह, कन्या आणि धनु राशीच्या लोकांसाठी काळ संमिश्र राहील. या 5 राशीच्या लोकांना पैसा तर मिळेलच पण खर्चही होईल. काही प्रकरणांमध्ये, ग्रह-तारे तुमच्या सोबत असतील, तर कामात व्यत्यय, तणाव आणि वाद होण्याचीही शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात.
मकर राशीच्या लोकांनी राहावे सांभाळून
सूर्य, बुध आणि शुक्र एकाच राशीत आल्याने मकर राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. कामात अडथळे येऊ शकतात. वाद होण्याची शक्यता आहे. पैशाची हानी आणि आरोग्याशी संबंधित समस्या देखील असू शकतात. नवीन काम सुरू करणे टाळा. कर्ज घेऊ नका. कामात निष्काळजीपणा आणि घाई देखील टाळावी.
बुधादित्य योगाने होते प्रगती
मिथुन, कन्या, सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांना सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बनलेल्या बुधादित्य शुभ योगाचे अधिक लाभ होतील. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. धनलाभ आणि फायदा होऊ शकतो. याशिवाय कर्क आणि मीन राशीच्या लोकांसाठी काळ शुभ राहील. या दोन ग्रहांच्या प्रभावामुळे मोठ्या प्रशासकीय योजना बनतील. त्यांच्यावर काम होईल आणि फायदाही होईल. शेअर बाजाराशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला असू शकतो.
आर्थिक लाभ देणारा लक्ष्मीनारायण योग
बुध आणि शुक्र एकत्र आल्यावर लक्ष्मी नारायण योगही तयार होतो. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. यामध्ये बुध ग्रहाच्या प्रभावामुळे मोठे आर्थिक व्यवहार, खरेदी आणि गुंतवणूक होत आहे. बुद्धीला प्रभावित करणारा हा ग्रह आहे. त्याच वेळी शुक्र आनंद आणि लाभ वाढवतो. या शुभ योगाच्या प्रभावाने आर्थिक लाभ, सौभाग्य आणि समृद्धी वाढते. देशाच्या आर्थिक स्थितीसाठी दोघांचीही स्थिती शुभ राहील. या शुभ योगाने महागाई कमी होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.