आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज (रविवार, 13 नोव्हेंबर) बुध ग्रहाने तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीमध्ये बुधाची स्थिती चांगली मानली जात नाही. हा ग्रह 2 डिसेंबरपर्यंत वृश्चिक राशीत राहील आणि त्यानंतर धनु राशीत प्रवेश करेल.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, बुध ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी दर बुधवारी श्रीगणेशाची पूजा करावी. बुध ग्रहासाठी मूग दान करावे. जाणून घ्या, सर्व 12 राशींवर बुध ग्रहाचा प्रभाव कसा राहील...
मेष - बुधामुळे अडचणी वाढू शकतात. निराशा टाळा. तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील, तरच यश मिळेल.
वृषभ - बुध ग्रहाचा तुमच्या राशीवर विशेष प्रभाव पडत नाहीये. जुन्या मेहनतीनुसार फळ मिळेल. यावेळी केलेल्या मेहनतीचे फळ आगामी काळात मिळू शकते.
मिथुन - या राशीसाठी बुध ग्रहाची स्थिती चांगली राहणार आहे. कुटुंब आणि समाजातील वातावरण अनुकूल राहील. धनलाभ होईल. तब्येतीची काळजी घेतली तर बरे होईल.
कर्क- वृश्चिक राशीतील बुध तुमच्यासाठी प्रभावी राहील. कामे वेळेत पूर्ण होतील. मान-सन्मानासह यशही मिळेल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.
सिंह राशी - या लोकांना सावधपणे काम करण्याची वेळ आहे. थोड्याशा निष्काळजीपणाने मोठे नुकसान होऊ शकते. चिंता वाढतील. वादविवाद टाळल्यास चांगले होईल.
कन्या- बुध ग्रहामुळे या लोकांना मोठे यश मिळू शकते. नवीन नोकरी मिळू शकते. प्रसन्नता राहील. अडथळे दूर करू शकाल.
तूळ- बुधामुळे काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. कामात यश मिळेल. चांगली बातमी मिळू शकते. नोकरीत लाभ होऊ शकतो.
वृश्चिक- आता बुध या राशीत राहील. यामुळे बुध लाभाची स्थिती निर्माण करू शकतो. नोकरीत मोठे यश मिळू शकते. ज्यांना नवीन नोकरी सुरू करायची आहे त्यांच्यासाठी वेळ अनुकूल असेल.
धनु - या राशीच्या लोकांनी आता थोडे सावध राहावे. बुध समस्या वाढवू शकतो. पैशाशी संबंधित कामात अडचणी येऊ शकतात. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर जोखीम घेण्यापूर्वी एखाद्या तज्ञाशी नक्की बोला.
मकर- बुधामुळे कामाचा ताण वाढू शकतो. कुटुंबाच्या मदतीने तुम्ही मोठी जबाबदारी योग्यरित्या पार पाडाल. नवीन संपर्क खूप फायदेशीर ठरू शकतात.
कुंभ - बुध तुमच्यासाठी लाभाची परिस्थिती निर्माण करू शकतो. आत्मविश्वास वाढेल. जुन्या काळापासून रखडलेल्या कामात गती येऊ शकते.
मीन - बुधामुळे मोठी कामेही सहज पूर्ण होतील. कुटुंबात शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.