आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्त बुधाची वक्री चाल:2 ऑक्टोबरपर्यंत बुध राहील वक्री, कुंभसहित या 5 राशींना नोकरी-व्यवसायात होईल लाभ

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या बुध कन्या राशीत असून 26 ऑक्टोबरपर्यंत याच राशीत राहील. ज्योतिषशास्त्रात बुध हा वाणी, बुद्धी, व्यवसाय आणि व्यवहाराचा कारक ग्रह मानला जातो. बुध 8 सप्टेंबर रोजी त्याच्या उच्च राशीत अस्त झाला आहे. आता 10 तारखेला वक्रीही होणार आहे. यानंतर 2 ऑक्टोबरला मार्गी होईल. अशा प्रकारे बुधाची स्थिती सतत बदलत जाईल. वक्री गतीमध्ये बुधाचे संक्रमण सर्व राशींवर प्रभाव टाकेल.

बुध ग्रह वक्री होणे महत्वाचे मानले जाते कारण बुध संचार व्यवस्था, वाणी, लेखन, गणित आणि तार्किक कार्यांचे संचालन करतो. बुध वक्री झाल्याने भांडणे, वाद, गैरसमजही होतात. जे लोक बुद्धीचा अधिक वापर करतात, त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो आणि निर्णय घेण्यासही त्रास होतो. वक्री बुध केवळ अशुभच नाही तर शुभ फळही देतो. वक्री बुधच्या प्रभावामुळे व्यवसायात फायदा आणि धनलाभ होतो. उत्पन्नाचे स्रोत वाढतात. वादात विजय मिळतो.

अस्त बुध वक्री होत असल्यामुळे तुमच्या राशीसाठी काहीसा असा राहील काळ

शुभ : मेष, सिंह, वृश्चिक, धनु आणि कुंभ
कन्या राशीत बुध वक्री झाल्यामुळे मेष, सिंह, वृश्चिक, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. अडकलेले पैसेही मिळण्याची शक्यता आहे. व्यवहार आणि गुंतवणुकीत फायदा होऊ शकतो. याशिवाय या राशीचे लोक मोठ्या कामासाठी योजना बनवतील. या लोकांची तर्कशक्तीही वाढेल.

अशुभ : वृषभ, मिथुन आणि तूळ
बुधाच्या चालीतील बदलामुळे वृषभ, मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल. या तीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. बचत संपण्याची आणि गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवहारातही काळजी घ्यावी लागेल. नशीब साथ देणार नाही. मज्जातंतूशी संबंधित आजार होऊ शकतात. नोकरदार लोकांसाठी कामात बदल आणि जागा बदलण्याची शक्यता आहे.

सामान्य : कर्क, कन्या, मकर आणि मीन
बुधाच्या चालीतील बदलामुळे कर्क, कन्या, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी काळ सामान्य राहील. या चार राशीच्या लोकांची ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कामासंदर्भात नवीन आणि मोठ्या लोकांशी भेट होऊ शकते. दैनंदिन कामात मेहनतही घ्यावी लागेल. धावपळ सुरूच राहील. तसेच व्यवहार आणि गुंतवणूक काळजीपूर्वक करावी लागेल. आरोग्याच्या बाबतीत या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...