आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य :जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा शुक्रवार

3 महिन्यांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • शुभ योगमध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, असा राहील दिवस

शुक्रवार, 10 एप्रिल रोजी दिवसाची सुरुवात विशाखा नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावाने सिद्धी नावाचा योग जुळून येत आहे. या योग आणि ग्रहस्थितीमुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील.


मेष: शुभ रंग : केशरी | अंक : १ आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल.


वृषभ: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८ दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेते मंडळींची लोकप्रियता वाढेल.


मिथुन : शुभ रंग : राखाडी | अंक : ५ आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असले तरी पुरेसा पैसाही उपलब्ध होणार आहे. दूरावलेल्या नात्यांतील काही गैरसमज दूर होतील.


कर्क : शुभ रंग : निळा | अंक : ७ आज स्वत:चे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल.आज उच्च राहणीमानाकडे तुमचा कल राहील. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर परत शोधा सापडेल.


सिंह : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ९ सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा.आज स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमधे वितुष्ट संभवते.


कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७ नोकरीच्या ठीकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरीष्ठांना प्रभावित करेल.


तूळ : शुभ रंग : भगवा | अंक : ३ रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. सरकार दरबारी रखडलेली काही कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत.


वृश्चिक : शुभ रंग : क्रिम | अंक : ६ नोकरीत वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. घरातील वडीलधाऱ्या मंडळींची मते विचारात घेणे गरजेचे आहे.


धनू : शुभ रंग : सोनेरी | अंक : ४ व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील.वैवाहीक जिवनांत संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील.


मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५ नोकरीच्या ठीकाणी अधिकारी वर्गाची आपल्यावर मर्जी आहेच या भ्रमात राहू नका. सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेणे हिताचे.


कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : २ आर्थिक स्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. सहकुटुंब चैन व करमणूकीस प्राधान्य द्याल. संध्याकाळी डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.


मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १ कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. कलाकार व खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येतील.

0