आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस

शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी दिवसाची सुरुवात मृगशीर्ष नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून आज सिद्धी नावाचा योग जुळून येत आहे. त्यामुळे, 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल आणि उर्वरीत राशीच्या लोकांसाठी संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.

येथे जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस

  • मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : ४

कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होईल.

  • वृषभ: शुभ रंग : चॉकलेटी | अंक : ३

आज दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींंना प्रवासाचे याेग अटळ आहेत. नव्या ओळखी होतील.

  • मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : २

पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.

  • कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८

आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक क्लीष्ट कामेही सोपी होतील. उच्चशिक्षितांना सुयश.

  • सिंह : शुभ रंग : तांबडा|अंक : ७

नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक रहाणे गरजेचे आहे.तरूणांनी व्सनसंपासून दूर रहाणे गरजेचे. कुसंगत टाळावी.

  • कन्या : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९

मोठया आर्थिक उलाढाली टाळायला हव्यात. आज विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकेल.

  • तूळ : शुभ रंग : आकाशी | अंक : ४

वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस.

  • वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : ६

सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून आज अपेक्षित सहकार्य मिळेल.

  • धनू : शुभ रंग : जांभळा | अंक : ५

नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाणार आहे.

  • मकर : शुभ रंग : पिस्ता | अंक : १

आज कामधंद्यातील काही अडचणी मानसिक स्वास्थ्य बिघडवतील. एकांत हवासा वाटेल. दैव साथ देईल.

  • कुंभ : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ३

कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहीणी आवडत्या छंदास वेळ देतील. विद्यार्थ्यांना सुयश.

  • मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : २

दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. जागाविषयक प्रश्न सुटतील. कर्जप्रस्ताव मंजूर होऊ शकतील.

0