आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राशीनुसार असा राहील आजचा दिवस

शुक्रवार, 12 फेब्रुवारी रोजी सूर्योदय धनिष्ठा नक्षत्रामध्ये होत असून या दिवशी परिघ नावाचा योग येत आहे. या दिवशी शत्रूच्या विरोधात केलेल्या कार्यात यश मिळू शकते. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे आज 12 पैकी 4 राशीच्या लोकांसाठी चांगला तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.

राशीनुसार असा राहील आजचा दिवस

मेष: शुभ रंग: पांढरा| अंक : ८
आज नोकरीत वरीष्ठांचे दडपण असेल. फक्त कर्तव्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. संध्याकाळी लाभ होईल.

वृषभ: शुभ रंग: जांभळा| अंक : ३
कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. गृहीणींना थोरांचे मानपान सांभाळावे लागतील.

मिथुन : शुभ रंग : क्रिम| अंक : ९
आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास आज करून चालणार नाही. कुणालाही मोफत सल्लेवाटप करू नका. आज फक्त आपल्या ताटात बघुन जेवा.

कर्क : शुभ रंग : तांबडा| अंक : १
जोडीदाराशी सामंजस्य राहील. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील. प्रवास कंटाळवाणे होणार आहेत.

सिंह :शुभ रंग : गुलाबी|अंक : ७
दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. संतुलन बिघडू शकेल.

कन्या : शुभ रंग : हिरवा|अंक : ९
आज मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरणार आहेत.

तूळ : शुभ रंग : मोतिया| अंक : ५
कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. मुले अज्ञाधारकपणे वागतील.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ६
क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

धनु : शुभ रंग : मोतिया| अंक : ४
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण असेल. आर्थिक लाभ होतील. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.

मकर : शुभ रंग : निळा| अंक : १
आज प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही आज पैशाची कमतरता भासणार नाही.

कुंभ : शुभ रंग : आकाशी| अंक : २
नोकरदारांना साहेबांचे मुड व घरी जोडीदाराचेही मूड सांभाळावे लागतील. सकुटुंब चैन कराल.

मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. दुपारनंतर एखादी महत्वाची बातमी कळेल.

बातम्या आणखी आहेत...