आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा शुक्रवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस

शुक्रवार, 14 ऑगस्ट रोजी दिवसाची सुरुवात मृगशीर्ष अहोरात्र या नक्षत्रामध्ये होत आहे. आजच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून व्याघात नावाचा योग येत आहे. या योगाच्या प्रभावातून 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस काही प्रमाणात अडचणींचा तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.

मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : ९
योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. मित्रमंडळींत माेठेपणा मिळेल.

वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : ८
अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतात. मित्रांच्या फार नादी लागूच नका.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
कार्यक्षेत्रात आज महत्वपूर्ण निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे.

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : १
भागिदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होतील. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

सिंह : शुभ रंग : राखाडी|अंक : ८
विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारीक देवाणघेवाण होईल. आज तुमचे विचार प्रगल्भ होतील.

कन्या : शुभ रंग : केशरी|अंक : ७
आज तुम्ही सकारात्मक दृष्टीकोन बाळगून नि:स्वार्थीपणे काही कामे कराल. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की.

तूळ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६
कामावर दांडी मारून थोडं करमणूकीस प्राधन्य द्यावेसे वाटेल. प्रेमप्रकरणांना आज ग्रीन सिग्नल आहे.

वृश्चिक : शुभ रंग : लाल | अंक : २
कुटुंबियांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी कराल. एखाद्या घरगुती समारंभात हजेरी लावाल.

धनू : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल. गृहीणींनी आज झाकाली मूठ झकालीच ठेवणे गरजेचे आहे.

मकर : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. तुमची भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

कुंभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ४
आज हातचे सोडून पळत्यामागे धावण्याचा मोह होईल. कार्यक्षेत्रात विरोधकांना कमजोर समजून चालणार नाही.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३
पैसा येण्याइतकेच जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील. चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे आहे. आज प्रतिष्ठेस जपावे.