आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

शुक्रवार, 17 जुलै रोजी दिवसाची सुरुवात रोहिणी नक्षत्रामध्ये आहे. या दिवशी वृद्धी नावाचा एक योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 6 राशींसाठी संमिश्र स्वरुपाचा राहू शकतो. उर्वरीत 6 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला ठरू शकतो.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

मेष : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १
कार्यक्षेत्रात मानमतराब वाढेल. अनपेक्षित हाेणारे लाभ मनाला दिलासा देतील. उपवरांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील.
वृषभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३ 

मनाच्या लहरीपणास थोडा लगाम गरजेचा आहे. अती महत्वाकांक्षांना ब्रेक लाऊन तब्येतीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. आज जोडीदाराशी सामंजस्य राहील.
मिथुन : शुभ रंग : जांभळा | अंक : ४
आज कंजूषपणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. बचतीचा विचार आज सोडूनच द्या. घरातील थोर मंडळींच्या होला हो करा.
कर्क : शुभ रंग : आकाशी | अंक : २ 

आज वाणीत गोडवा ठेऊन विरोधकांनाही आपलेसे कराल. राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईलच. तुमचा उत्साह व कार्यक्षमता वाढेल.
सिंह : शुभ रंग : पिवळा | अंक : ७ 

नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. मित्र दिलेली अश्वासने पाळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहणे हिताचे.
कन्या : शुभ रंग : आकाशी | अंक : ५ 

नोकरीच्या ठीकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त बिनचूक कामास प्राधान्य देणे हिताचे राहील. रिकाम्या गप्पांतून गैरसमज वाढतील. आज दैवाची साथ आहेच.
तूळ : शुभ रंग : लाल | अंक : ६

आज घराबाहेर वावरताना डोके शांत ठेवायला हवे. आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. आज काही फसव्या संधी येतील, हातचे सोडताना विचार करा.
वृश्चिक : शुभ रंग : मोतिया | अंक : ८
मेहनतीच्या प्रमाणात मोबदला कमीच राहील. तुमची तब्येत जरी नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील. व्यावसायिकांची आवक उत्तम राहील.
धनू : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९ 

मान अपमानांच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. थोडी संयमाची कसोटी राहील. दिवस तितकासा अनुकूल नसला तरी काही येणी असतील तर वसूल होतील.
मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ७
काही मनाजोगत्या घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृध्दी होईल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.
कुंभ : शुभ रंग : मरून | अंक : ३ 

काही जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. पार्लर्स फोटोग्राफी, मॉडेलींग सारखे व्यवसाय तेजीत चालतील.विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. आईचे मन सांभाळा.
मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : २ 

संमिश्र फळे देणारा दिवस असून आज काम कमी व धावपळच जास्त होईल. एखादा पत्ता शोधण्यासाठी वणवण होईल. आज भावंडात सामंजस्य राहील.