आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शुक्रवार, दिनांक 19 जून रोजी दिवसाची सुरुवात कृत्तिका नक्षत्रामध्ये होत आहे. आज ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून धृती नावाचा योग जुळून येत आहे. या दिवशी 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...
आज विश्रांती गरजेची आहे. केवळ भिडस्तपणा पायी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारू नका. अती काबाड कष्ट तब्येत बिघडण्यास कारणीभूत होतील.
कामाच्या व्यापात स्वत:च्या आवडी निवडी दुर्लक्षित होतील. रिकामटेकडया गप्पांतून वादविवाद निर्माण होतील. वैवाहीक जिवनांत जोडीदारास समजून घ्या.
आज तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील.रुग्णांनी पथ्यपाणी पाळणे गरजेचे आहे. काही येणी असल्यास वसूल होऊ शकतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश.
कलाकार मंडळी प्रसिध्दीच्या झोतात राहतील.चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज स्वत:च्या आवडी निवडीस प्राधान्य द्याल.
वास्तू व वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. कलेच्या क्षेत्रातील मंडळींना स्ट्रगल करावी लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्व कळेल.
प्रॉपर्टी खरेदी विक्रिचे व्यवहार टाळलेले बरे. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. कामाच्या व्यापात कुटुंबियांना वेळ देणे अशक्य होईल.
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल. आज आर्थिक बाजू भक्कम राहील. मोठी खरेदी कराल. महत्वाच्या वाटाघाटीत आपली बाजू प्रभावीपणे मांडू शकाल.
आळस झटकून कामाला लागाल, परंतू अती उत्साहाच्या भरात काही चुकीचे निर्णय घ्याल असलेला पैसा जपून वापरा. कुणाला शब्द देऊ नका.
काम सोडून काही निरर्थक वादविवादात वेळ खर्च होण्याची शक्यता आहे. आज आपल्या काही तत्वांना मुरड घालावी लागेल. प्रवासात झोपून चालणार नाही.
दुरावलेले नातलग एकत्र येतील. मित्र अश्वासने पूर्ण करतील. नव्या योजना वेग घेतील. इच्छापूर्तीचा दिवस असल्याने फक्त शुभच चिंता. दैव तुमच्याच बाजूने.
भावना व कर्तव्य याचा समन्वय साधावा लागणार आहे. कामाच्या ठीकाणी हितशत्रू तुमच्या चुका शोधायचा प्रयत्न करतील. आज संयम ढळू देऊ नका.
सरकार दरबारी रखडलेल्या कामांसाठी वशिला शोधावाच लागेल. अधिकारी वर्गास हाताखालच्या लोकांची नाराजी पत्करावी लागेल. प्रतिकूल दिवस.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.