आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे जाणून घ्या राशीनुसार असा राहील दिवस

शुक्रवार, 19 मार्च रोजी दिवसाची सुरुवात कृत्तिका नक्षत्रामध्ये होत असून विष्कंभ नावाचा योग जुळून येत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून आज 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस समाधानकारक ठरू शकतो. तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील.

येथे जाणून घ्या राशीनुसार असा राहील दिवस

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
विविध मार्गाने पैसा येईल. खर्चाचेही विविध मार्ग खुणावतील. कदाचित दंतवैद्याची भेट घ्यावी लागेल.

वृषभ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
आज तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन बाळगून नि:स्वार्थीपणे काही कामे कराल. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की मिळेल. सज्जनांच्या सहवासात विचार प्रगल्भ होतील.

मिथुन : शुभ रंग : आकाशी| अंक : ६
कार्यक्षेत्रात आज महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. भागीदारी व्यवसायात देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : ४
राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आज अनपेक्षित पैसा मिळवून देईल. भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

सिंह : शुभ रंग : पिस्ता|अंक : ५
अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. वाहतुकीचे नियम मोडू नका.

कन्या : शुभ रंग : लाल|अंक : २
आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. आजी-आजोबांनी फक्त नातवंडांत रमणे हिताचे राहील.

तूळ : शुभ रंग : हिरवा| अंक : ७
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागेल. काही जुनी तत्त्वे गुंडाळून ठेवावी लागतील. हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. वादविवादात तुमचे मत प्रभावी राहील.

धनू : शुभ रंग : पांढरा| अंक : ३
काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. आज फक्त कष्ट करीत राहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा.

मकर : शुभ रंग : केशरी| अंक : ९
मौजमजेस प्राधान्य द्याल. चंगळवादी वृत्ती राहील. आज तुम्ही काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल.

कुंभ : शुभ रंग : तांबडा| अंक : ५
प्रॉपर्टीचे काही अपुरे व्यवहार मार्गी लागतील. वास्तू व वाहन खरेदीसठी कर्जमंजुरी होईल. यशदायी दिवस.

मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : १
नोकरीच्या ठिकाणी कामाशिवाय फार खोलात शिरू नका. मित्र चुकीचेच सल्ले देतील. मोह टाळा.

बातम्या आणखी आहेत...