आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

शुक्रवार, 2 एप्रिल रोजी सूर्योदय व्यतिपात नक्षत्रामध्ये होत असून व्यतिपात नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावातून 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

मेष : शुभ रंग : तांबडा| अंक : १
आजचा दिवस तुमचा आत्मविश्वास वाढविणाराच असेल. दिवसाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे उरका.

वृषभ : शुभ रंग : आकाशी| अंक : ३
कार्यक्षेत्रात सतर्कपणे राहून वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. नोकरदारांना सहकाऱ्यांमधे मिळून मिसळून राहूनच प्रतिकूल वातावरणावर मात करावी लागेल.

मिथुन : शुभ रंग : मोतिया| अंक : २
भागीदारी व्यवसायात आज तीव्र स्वरूपाचे मतभेद होऊ शकतील. देण्या-घेण्याचे व्यवहार चोख असावेत. नव्या उपक्रमांची सुरुवात आज नको.

कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ४
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.महत्त्वापूर्ण निर्णय जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ५
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधक माघार घेतील. श्रमसाफल्याचे समाधान मिळू शकेल.

कन्या : शुभ रंग : क्रिम|अंक : ३
कुटुंबात आज काही मनासारख्या घटना घडतील. मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असून तुम्हाला प्रत्येक कामात उत्साह राहील. खर्चावर ताबा गरजेचा.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : ६
कौटुंबिक वाद असतील तर दुपारनंतर सुसंवादाने मिटतील. काही दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल.

धनू : शुभ रंग: चंदेरी|अंक: ९
आज तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडतील.

मकर : शुभ रंग : राखाडी|अंक: ८
हौशी मंडळींना जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. उपवरांना योग्य स्थळे चालून येतील.

कुंभ : शुभ रंग : भगवा| अंक : ५
तुमची मोठ्या लोकांसह उठबस फायदेशीर राहील. घराबाहेर तुमचे वक्तृत्व व कर्तृत्वही प्रभावी राहील.

मीन : शुभ रंग : मरून| अंक : २
नोकरदारांना साहेबांचे मूड सांभाळावेच लागतील. अधिकारांचा वापर करताना भिडस्तपणा बाळगू नका. नामवंतांचा सहवास लाभेल.

बातम्या आणखी आहेत...