आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा राहील शुक्रवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 20 ऑगस्ट रोजी दिवसाची सुरुवात उत्तराषाढा नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह स्थिती आणि नक्षत्रामुळे आज आयुष्मान नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस फलदायी राहील. तर उर्वरीत राशींसाठी हा दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...

मेष: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
पतप्रतिष्ठा वाढेल. आज आप्तस्वकियात तुमच्या शब्दास मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. आज यशदायी दिवस.

वृषभ: शुभ रंग : सोनेरी | अंक : ३
नवीन झालेले परिचय फायदेशीर ठरतील. आज तुम्हाला कुटुंबासाठी वेळ देणे कठीण जाईल. समाजकार्य कराल.

मिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
जागेसंबंधीत महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागतील.आज मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : २
व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील.

सिंह : शुभ रंग : अबोली | अंक : ५
कार्यक्षेत्रात महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर स्वप्नरंजनापेक्षा प्रयत्नांस प्राधान्य गरजेचे राहील.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३
कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील. इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण ठेवा.

तूळ : शुभ रंग : केशरी | अंक : ४
इतरांच्या भानगडीत पडण्याचा मोह होईल. पण, तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल.

वृश्चिक : शुभ रंग : पिवळा | अंक : ६
आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद संभवतात.

धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ८
उद्योग व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. आपल्या कर्तृत्वास थोरामोठ्यांचे अाशीर्वाद लाभतील.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
जुन्या मित्रमंडळींच्या भेटीने मन ताजेतवाने होईल.दिवस लाभाचा असून अनेक अवघड कामे सोपी होतील. काही भाग्यवान नव्या घराचा ताबा घेतील.

कुंभ : शुभ रंग : तांबडा| अंक : ९
आज संमिश्र फळे देणारा दिवस असून आवक-जावक समान राहील. शब्द जपून वापरल्यास वाद टाळता येतील. थोरामोठ्यांंच्या वयाचा मान राखा.

मीन : शुभ रंग : भगवा | अंक : ७
हट्टीपणावर मात करून आज संयमाने वागण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात कराल.

बातम्या आणखी आहेत...