आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शुक्रवार, 20 नोव्हेंबर रोजी दिवसाची सुरुवात उत्तराषाढा नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या परिस्थितीतून आज गंड आणि वृद्धी असे दोन योग जुळून येत आहेत. या योगांच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारा ठरेल.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...
मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : २
काही जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. पार्लर्स फोटोग्राफी, मॉडेलींग सारखे व्यवसाय तेजीत चालतील.विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. आईचे मन सांभाळा.
वृषभ: शुभ रंग : भगवा | अंक : ९
काही मनाजोगत्या घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृध्दी होईल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.
मिथुन : शुभ रंग : आकाशी| अंक : १
कार्यक्षेत्रात मानमतराब वाढेल. अनपेक्षित हाेणारे लाभ मनाला दिलासा देतील. उपवरांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील.
कर्क : शुभ रंग : केशरी| अंक : ५
संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग धावपळच जास्त होईल. एखादा पत्ता शोधण्यासाठी वणवण होईल. भावंडात सामंजस्य राहील.
सिंह : शुभ रंग : लाल | अंक : ८
आज कंजूषपणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. बचतीचा विचार आज सोडूनच द्या. घरातील थोर मंडळींच्या होला हो करा.
कन्या : शुभ रंग : निळा | अंक : ४
मनाच्या लहरीपणास आवर घालणे गरजेचे. अती महत्वाकांक्षांना ब्रेक लाऊन तब्येतीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. आज जोडीदाराशी सामंजस्य राहील.
तूळ : शुभ रंग : गुलाबी | अंक : २
नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. मित्र दिलेली अश्वासने पाळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहणे हिताचे.
वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ३
नोकरीच्या ठीकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त बिनचूक कामास प्राधान्य देणे हिताचे राहील. रिकाम्या गप्पांतून गैरसमज वाढतील. आज दैवाची साथ आहेच.
धनू : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७
आज वाणीत गोडवा ठेऊन विरोधकांनाही आपलेसे कराल. राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईलच. तुमचा उत्साह व कार्यक्षमता वाढेल.
मकर : शुभ रंग : क्रिम | अंक : ८
आज घराबाहेर वावरताना डोके शांत ठेवायला हवे. आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. आज काही फसव्या संधी येतील, हातचे सोडताना विचार करा.
कुंभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : १
मान अपमानांच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. थोडी संयमाची कसोटी राहील. दिवस तितकासा अनुकूल नसला तरी काही येणी असतील तर वसूल होतील.
मीन : शुभ रंग : मरून | अंक : ६
मेहनतीच्या प्रमाणात मोबदला कमीच राहील. तुमची तब्येत जरी नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील. व्यावसायिकांची आवक उत्तम राहील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.