आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

शुक्रवार, 21 ऑगस्ट रोजी दिवसाची सुरुवात उत्तरा नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस विशेष फळ देणारा ठरू शकतो. उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

मेष : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७

आज स्वावलंबन महत्त्वाचे राहील. रागावून निघून गेलेल्या व्यक्ती आज दुपारनंतर घरी परत येतील.

वृषभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ९

नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल.

मिथुन : शुभ रंग : मरून | अंक : ३

रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. सरकार दरबारी रखडलेली काही कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

कर्क : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८

भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. वैवाहिक जीवनात पत्नीची मते विचारात घेणे गरजेचे.

सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १

व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील.

कन्या : शुभ रंग : राखाडी | अंक : ४

नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाची आपल्यावर मर्जी आहेच या भ्रमात राहू नका. सहकाऱ्यांशी जुळवून घ्या.

तूळ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३

सहकुटुंब मनोरंजनास प्राधान्य द्याल. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतोय.

वृश्चिक : शुभ रंग : डाळींबी | अंक : ५

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी येतील.

धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : २

आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.

मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : १

दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागतील.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६

पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे राहतील.

मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५

उद्योग व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. आपल्या कर्तृत्वास थोरामोठ्यांचे अाशीर्वाद लाभतील. प्रसन्न दिवस.