आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस

शुक्रवार, 22 जानेवारी रोजी दिवसाची सुरुवात भरणी नक्षत्रामध्ये होत आहे. आज ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावातून 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस समाधानकारक ठरू शकतो.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस

मेष: शुभ रंग: पिस्ता| अंक : १
कौटुंबातील वातावरण उत्साही व आनंदी राहील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल.

वृषभ: शुभ रंग: पांढरा| अंक : ४
दैनंदीन कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज आवक पुरेशी राहील. जागाविषयक प्रश्न सुटतील. प्रेमप्रकरणांत मात्र डोक्याला नुसता ताप होईल.

मिथुन : शुभ रंग : मरून| अंक : ८
आजचा दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींंना प्रवासाचे याेग अटळ आहेत. नव्या ओळखी होतील.

कर्क : शुभ रंग : भगवा| अंक : २
पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडेल. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.

सिंह :शुभ रंग : क्रिम|अंक : ७
सडेतोड बोलण्यामुळे हितसंबंधात कटुता येईल. डोके थंड व वाणीत गोडवा ठेवा. क्लीष्ट कामेही सोपी होतील.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ९
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही महत्वाच्या कामानिमित्त पायपीट होईल.

तूळ : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. कर्जप्रस्ताव मंजूर होऊ शकतील. हितशत्रू पळ काढतील.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : २
नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. आज जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

धनु : शुभ रंग : निळा| अंक : ३
कामधंद्यात आज काही अनपेक्षित अडचणी आल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आज एकांत हवासा वाटेल.

मकर : शुभ रंग : डाळिंबी| अंक : १
विश्वासू माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकेल. आज स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस.

मीन : शुभ रंग : आकाशी| अंक : ४
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरूणांनी व्सनसंपासून दूर रहाणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी. येणी वसूल होऊ शकतील.

बातम्या आणखी आहेत...