आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा शुक्रवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या तुमच्या राशीसाठी असा राहील दिवस

शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी उत्तराषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या परिस्थितीतून शुक्रवारी धृति नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावातून 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस दिलासा देणारा राहील. तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.

जाणून घ्या तुमच्या राशीसाठी असा राहील दिवस

मेष : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ७
आर्थिक बाजू उत्तम असेल. किरकोळ घरदुरुस्तीची कामे उद्भवतील. वाहनाचीही काळजी घ्यावी लागेल.

वृषभ : शुभ रंग : लाल | अंक : ८
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. स्वप्नरंजन सोडून कृतीस प्राधान्य द्याल. आज शब्दांचा वापर जपून केलेला बरा.

मिथुन : शुभ रंग : आकाशी | अंक : ६
आज तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.देण्या-घेण्याचे व्यवहार मात्र काळजीपूर्वक करावेत.

कर्क : शुभ रंग : मरून | अंक : ३
काही अत्यावश्यक खर्च हात जोडून उभे असतील. थोर मंडळी आपलेच खरे करतील. कमीच बोला.

सिंह : शुभ रंग : राखाडी | अंक : ९
नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. किचकट कामे सोपी होतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल.

कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४
व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल.हाताखालच्या मंडळींत मिळून मिसळूून राहणे गरजेचे.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : हिरवा | अंक : ५
कार्यक्षेत्रात आज काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. मानसिक शांती सत्संगातूनच मिळेल.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : १
दिवस तितकासा अनुकूल नाही, नव्या उपक्रमांची सुरुवात आज नको. पत्नी जे म्हणेल त्यास हो म्हणा.

धनु : शुभ रंग : मोरपंखी | अंक : २
आज पत्नीस अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यात जोडीने मिरवाल.

मकर : शुभ रंग : भगवा | अंक : २
जुन्या प्रकृतीच्या तक्रारी डोके वर काढतील. परंतु आज काही येणी असतील तर मात्र वसूल होऊ शकतील.

कुंभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५
केवळ चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे हिताचे राहील. विद्यार्थ्यांना एखाद्या नव्या विषयात गोडी वाटेल.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६
उद्योगधंद्यात प्रगतीचा रथ वेगवान राहील. तुम्ही घेतलेले अचूक निर्णय फायदेशीर ठरतील.कलाकारांची मात्र वणवण चालू राहील.