आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य :जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मघा नक्षत्रामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

शुक्रवार, 26 जून रोजी दिवसाची सुरुवात मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती सिद्धी नावाचा योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

  • मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : १

सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबियांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी तुमच्या हातून होईल. आज आपल्या कुटुंबियांठी पूर्ण वेळ द्याल.

  • वृषभ: शुभ रंग : जांभळा | अंक : ३

आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल.गृहीणींनी झकाली मूठ झकालीच ठेवणे गरजेचे आहे. वाहतूकीचे नियम तोडल्यास दंड चुकणार नाही.

  • मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५

राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. भाग्योदयाकडे वाटचाल होईल. विरोधकांचा विरोध गोड बोलूनच थोपवून धरता येईल.

  • कर्क : शुभ रंग : गुलाबी | अंक : ४

मन काहीसे चंचल राहील. काम कमी व धावपळच जास्त होईल. हातचे सोडून मृगजळामागे धावण्याचा मोह होईल. कार्यक्षेत्रात विरोधकांना कमजोर समजू नका.

  • सिंह : शुभ रंग : लाल| अंक : २

पैसा येण्याइतकेच पैसा जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील. चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे आहे. कुसंगतीने प्रतिष्ठा धोक्यात येईल. सतर्क रहा.

  • कन्या : शुभ रंग : हिरवा| अंक : ६

योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. व्यवसायात आवक मनाजोगती असेल. पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मित्रमंडळींत मोठेपणा मिळेल.

  • तूळ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ७

अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येऊ शकतात. मित्रांच्या फार नादी लागूच नका.

  • वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९

कार्यक्षेत्रात आज महत्वपूर्ण निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे.

  • धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८

भागिदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता असणे गरजेचे. वाहन सुरक्षित चालवा.

  • मकर : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

आज काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारीक देवाणघेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. वैवाहीक जिवनांत सुसंवाद राहील. छान दिवस.

  • कुंभ : शुभ रंग : क्रिम| अंक : ५

काही कामे नि:स्वार्थीपणे कराल. कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असेल. तरीही तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की.

  • मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ४

नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल.आज कामावर दांडी मारून थोडं करमणूकीस प्राधन्य द्यावेसे वाटेल. प्रेमप्रकरणांना आज ग्रीन सिग्नल आहे.

0