आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशुक्रवार, 5 मार्च रोजी सूर्योदय अनुराधा नक्षत्रामध्ये होत असून ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून हर्षण नावाचा योग येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस
मेष : शुभ रंग : क्रीम| अंक : ४
रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी आहे. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे.
वृषभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ५
घरात अधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असाल तर अनेक संधी चालून येतील. गूढशास्त्रच्या अभ्यासकांना प्रचिती येईल.
मिथुन : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस असून कुटुंबीयांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.
कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : १
दैनंदिन कामातही काही अडथळ्यांचे डोंगर उभे असतील. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.
सिंह : शुभ रंग : हिरवा|अंक : ७
आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. भावनेच्या भरात कुणाला शब्द देऊ नका.
कन्या : शुभ रंग : लाल|अंक : २
व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना यशस्वीपणे कराल. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील.
तूळ : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
आज काही देणी चुकवावी लागणार आहेत. हौसमौज करण्यावर थोडी मर्यादा येईल. डोळ्यांची निगा राखा.
वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८
वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मोठ्या लोकांच्या ओळखीने हित साधाल. संततीकडून सुवार्ता.
धनु : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ५
नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागणार आहे.रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.
मकर : शुभ रंग : भगवा| अंक : ९
शासकीय कामे रखडणार आहेत. गृहिणींचा अाज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.
कुंभ : शुभ रंग : भगवा| अंक : ९
कार्यक्षेत्रात झटपट लाभाचा मोह टाळा. गाेडबोल्या मंडळींपासून दोन हात दूरच राहा. आज रिस्क नकोच.
मीन : शुभ रंग : जांभळा| अंक : ६
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध जुळून येतील. ध्येयाचा पाठलाग करताना प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आज पत्नीचे सल्ले डावलू नका.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.