आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शुक्रवार, 8 जानेवारी रोजी दिवसाची सुरुवात स्वाती नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून आज धृती नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावातून 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.
येथे जाणून घ्या कसा राहील आजचा दिवस
मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : १
व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालणे गरजेचे. काही निर्णय झटपट घ्यावे लागतील. संधी सोडू नका.
वृषभ : शुभ रंग : सोनेरी| अंक : २
वडीलधाऱ्यांशी मतभेद होतील, पण त्यांच्या वयाचा मान राखाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशीही नमतेच घ्यावे लागेल. आज अहंकारास सुटीच देणे हिताचे.
मिथुन : शुभ रंग : चंदेरी|अंक : ९
उतावीळपणे कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही.आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. महत्त्वाच्या चर्चा, वाटाघाटी उद्यावरच ढकलाव्यात.
कर्क : शुभ रंग : गुलाबी|अंक : ८
बऱ्याच दिवसांनी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येईल. कवींना प्रेमगीते सुचतील.
सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ९
आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका.
कन्या : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६
आज एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावे लागणार आहे.
तूळ : शुभ रंग : पांढरा| अंक : ७
फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कौटुंबिक वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना गृहिणींना थकवा जाणवेल.
वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. मातोश्रींशी मतभेद संभवतात.
धनू : शुभ रंग : मोरपिशी| अंक : ५
योग्य माणसे आज संपर्कात येतील. ठामपणे घेतलेले महत्त्वाचे फायदेशीर ठरतील. पैसा खेळता राहील.
मकर : शुभ रंग : मरून| अंक : १
हाती पैसा राहील. आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आज स्वत:चे लाड पुरवाल.
कुंभ : शुभ रंग : नारिंगी | अंक : ३
आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे.
मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २
हौशी मंडळींना आज जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.