आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

शुक्रवार, 9 एप्रिल रोजी दिवसाची सुरुवात पू. भाद्रपदा अहोरात्र नक्षत्रामध्ये होत असून शुक्ल नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावातून 12 पैकी 4 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

मेष : शुभ रंग : क्रीम| अंक : २
मनाजोगत्या घटनांनी मनोबल वाढेल. एखाद्या कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. इतरास मदत करू शकाल.

वृषभ : शुभ रंग : भगवा| अंक : ३
आज विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. आज झालेले प्रवास सुखकारक होतील.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ५
आर्थिक स्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. आवडत्या क्षेत्रात यशस्वी नेतृत्व कराल. आज सहकुटुंब चैन करणार आहात.

कर्क : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
आज आधुनिक रहाणीमानाची आवड जोपासता येईल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल.

सिंह : शुभ रंग : सोनेरी|अंक : ४
कार्यक्षेत्रात राजकारणाचा सामना करावा लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.

कन्या : शुभ रंग : गुलाबी|अंक : ६
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी उपलब्ध होतील.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८
व्यावसायिक चढ-उतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही जणांचा आज गूढशास्त्रांकडे कल वाढेल.खेळाडू स्पर्धा जिंकतील.

वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता| अंक : ९
जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. प्रवास होतील.

धनू : शुभ रंग : आकाशी|अंक : ३
कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. वैवाहिक जीवनात शब्दांचा वापर कमीच करा.

मकर : शुभ रंग : भगवा|अंक: ७
आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. पत्नीस दिलेली वचने पाळाल.

कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : ८
नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर होतील. येणी वसूल होतील.

मीन : शुभ रंग : निळा| अंक : १
आज अति उत्साहात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते.

बातम्या आणखी आहेत...