आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार

शुक्रवार 5 फेब्रुवारी रोजी सूर्योदय विशाखा नक्षत्रामध्ये असून यामुळे वृद्धी नावाचा नक्षत्र जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस समाधानकारक ठरू शकतो.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ६
कोणत्याही नवीन कामास प्रारंभ आज नको. मोठे सौदे टाळा. गर्भवती महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.

वृषभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
आज जिवलग मित्र दिलेले शब्द पाळणार आहेत. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. मोठ्या लोकांच्या ओळखी अडचणीच्या प्रसंगी कामी येतील.

मिथुन : शुभ रंग : निळा| अंक : ५
हट्टीपणास लगाम घालणे गरजेचे. इतरांचे विचार ऐकून घ्या. महत्त्वाचे निर्णय घाईगर्दीत घेऊ नका. कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकणे गरजेचे आहे.

कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ९
काही कौटुंबिक प्रश्न तुम्हाला चिंताग्रस्त करतील. परंतु जोडीदाराच्या खंबीर सहकार्याने त्यावर मात कराल.

सिंह : शुभ रंग : डाळिंबी|अंक : ७
आर्थिक बाजू उत्तम असेल. घरसजावटीच्या शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल. मुलांना दिलेले शब्द पाळाल.

कन्या : शुभ रंग : हिरवा|अंक : ५
घरात काहीतरी कारणाने वडीलधाऱ्यांंशी मतभेद होऊ शकतात. आज प्रवासात काही हितसंबंध जुळतील.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ८
कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे. तुम्ही सहज घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : १
आज तुम्ही खूपच आनंदी व उत्साही असाल. एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल.

धनू : शुभ रंग : मरून| अंक : २
आज काही मोठे खर्च दार ठोठावणार आहेत. आध्यात्मिक मार्गाकडे आज तुमचा कल राहील.

मकर : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळू शकेल.

कुंभ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ५
अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत.आज मित्रमंडळींबरोबर मात्र काहीतरी बिनसणार आहे.

मीन : शुभ रंग : क्रीम| अंक : ४
आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्या मागे धावूच नका.

बातम्या आणखी आहेत...