आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे जाणून घ्या राशीनुसार असा राहील आजचा दिवस

शनिवार, 13 फेब्रुवारी रोजी शततारका नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून शिव नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील.

येथे जाणून घ्या राशीनुसार असा राहील आजचा दिवस

मेष : शुभ रंग : लाल| अंक : ८
आज जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. तुमचे विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. यशदायी दिवस.

वृषभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ७
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. प्रमोशनच्या मागार्तील अडथळे दूर होतील.धंद्यातील मोठ्या आर्थिक उलाढाली यशस्वी होतील.

मिथुन : शुभ रंग : मरून|अंक : ३
काही क्षुल्लक कामात अडचणींचे डोंगर उभे राहतील. नास्तिक मंडळीही आज देवाला एखादा नवस बोलतील. ज्येष्ठांना आज उपासनेची प्रचिती येईल.

कर्क : शुभ रंग : आकाशी|अंक : ६
तब्येत नरमच असल्याने दिवस कंटाळवाणाच जाईल. शत्रू मित्रांमध्येच लपलेले असतील. सतर्क राहा.

सिंह : शुभ रंग : पिस्ता|अंक : ४
कार्यक्षेत्रात आज नवी आव्हाने जिद्दीने स्वीकाराल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आनंदी दिवस.

कन्या : शुभ रंग : राखाडी|अंक : ९
नोकरदारांना वरिष्ठांच्या मागेपुढे करावेच लागणार आहे. आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा.

तूळ : शुभ रंग : सोनेरी| अंक : १
आज स्वत:च्या प्रेमात राहाल. चैन करण्यासाठी मनसोक्त खर्च कराल. सौंदर्याची काळजी घ्याल.

वृश्चिक : शुभ रंग : हिरवा| अंक : ५
आर्थिक आवक पुरेशी असून परिवारात सामंजस्याचे वातावरण राहील. मुले आज्ञा पाळतील.

धनू : शुभ रंग : केशरी| अंक : १
ज्येष्ठ मंडळी तीर्थाटनाचे बेत आखतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश तितकेसे सोपे नाही.

मकर : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढतील.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६
आज तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. स्वत:चेच खरे करण्याकडे तुमचा कल राहील. काही नाती दुरावतील.

मीन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५
काही दूरचे नातलग संपर्कात येतील. काही मान-अपमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल.