आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे जाणून घ्या कसा राहील आजचा दिवस

शनिवार, 21 नोव्हेंबर रोजी श्रवण नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून आजच्या दिवशी ध्रुव नावाचा योग जुळत आहे. या योगाच्या प्रभावातून 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.

येथे जाणून घ्या कसा राहील आजचा दिवस

मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ९
शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय चांगले चालतील. कलाकारांना यश सोपे नाही, स्ट्रगल वाढवावे लागेल.

वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ८
कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. आज अपेक्षित मेल्स येतील. प्रापर्टीविषयक आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. मातोश्रींच्या हो ला हो करून विषय संपवा.

मिथुन : शुभ रंग : क्रीम| अंक : ४
सर्व लहान-मोठे आर्थिक व्यवहार यशस्वीरीत्या पार पडतील. पैशाची आवक मुबलक राहील. शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील, लक्षच देऊ नका.

कर्क : शुभ रंग : तांबडा| अंक : १
नोकरी-धंद्याच्या ठिकाणी आज अहंकारास थारा देऊ नका. मृदू वाणीनेच अनेक क्लिष्ट कामे सोपी होतील.

सिंह : शुभ रंग : सोनेरी| अंक : २
आज घरात थोरांशी मतभेद संभवतात. फार ताणू नका. दूरच्या प्रवासात आज मौल्यवान ऐवज सांभाळा.

कन्या : शुभ रंग : भगवा| अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी अनुकूलता वाढेल. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. अनपेक्षित लाभ होतील.

तूळ : शुभ रंग : आकाशी|अंक : ५
उत्साही दिवस असून तुमचा कामाचा उरक चांगला असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची कृपा राहील.

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा|अंक : ४
कोणतीही गोष्ट आज सहज साध्य होणार नाही तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नास आज दैवाची साथ निश्चित.

धनू : शुभ रंग : केशरी| अंक : ६
आज तुम्ही आधी स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य देणे गरजेचे आहे. मोठ्या आर्थिक उलाढाली आज टाळा.

मकर : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. विरोधकांनाही तुमची मते पटू लागतील. आज आशादायी दिवस.

कुंभ : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ७
नोकरीच्या ठिकाणी विरोधकांचा उपद्रव वाढणार आहे. साहेबांना आज गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील.

मीन : शुभ रंग : पिस्ता|अंक : ९
एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळू शकेल. आनंदी दिवस.