आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रविवार, 14 फेब्रुवारी रोजी दिवसाची सुरुवात पूर्व भाद्रपदा नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून आज सिद्ध नावाचा योग जुळून येत आहे. या स्थितीमुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस...
मेष : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.
वृषभ : शुभ रंग : हिरवा| अंक : ८
क्षुल्लक कारणाने घरातील थोरांशी मतभेद संभवतात. कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत व्यवहार नकोत.
मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. पत्नीस दिलेली वचने पाळाल.
कर्क : शुभ रंग : क्रीम| अंक : ६
बेरोजगारांची वणवण संपेल. मित्रांमध्ये रिकामटेकड्या चर्चेत काही वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. आज उगीच एखाद्या वादात पडणे टाळा.
सिंह : शुभ रंग : चंदेरी|अंक : ९
आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल. नवविवाहिताना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल. प्रेमवीरांसाठी दिवस चांगला ठरू शकतो.
कन्या : शुभ रंग : गुलाबी|अंक : ८
कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. दुसऱ्यास मदत करताना आधी स्वत:ची शिल्लक तपासणे गरजेचे.
तूळ : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
अथक मेहनतीच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरूच राहील. ठरवलेले कार्य आणि प्रस्ताव आज मार्गी लागू शकतात. भावंडांत सलोखा राहील.
वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : १
सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. एकूणच छान दिवस राहील.
धनू : शुभ रंग : केशरी| अंक : ५
आज संयमाची गरज असून अति आक्रमकतेने घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. मुलांनी आज्ञेत राहावे. कुठलाही निर्णय विचारपूर्वक घ्यावा.
मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३
हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यापूर्वी विचार आवश्यक. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवावी.
कुंभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ४
आज अपुरी स्वप्ने साकार होतील. विरोधकही शरण येतील. प्रेमवीरांसाठी चांगला दिवस.
मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
उद्योग-व्यवसायात प्रगतीरथ वेगवान राहील. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. मानसन्मानात वृद्धी होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.