आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

रविवार, 4 ऑक्टोबर रोजी सूर्योदय अश्विनी नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून आज हर्षण नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावातून 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र ठरू शकतो.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ८
वैवाहीक जिवनात गोडवा राहील. मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. छान दिवस.

वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : ४
नोकरदारांना जास्त वेळ थांबून काम करावे लागेल. वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. आज रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावरच ढकलेली बरी.सरकार दरबारी कामे रखडतील. गृहीणींचा अाज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.

कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
नवीनच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करताना सावध रहायला हवे. कुणावरही अवलंबून राहू नका.

सिंह :शुभ रंग : मरून|अंक : ९
ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ६
एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : आकाशी|अंक : ८
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील. कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ४
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. येणी वसूल होतील.

धनु : शुभ रंग : भगवा | अंक : ३
नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदीन कामातही काही अडथळे येतील.

मकर : शुभ रंग : पिवळा| अंक : ५
आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील.

कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : १
आवक मनाजोगती असल्याने तुमची मन:स्थिती उत्तम राहील. वाढत्या स्पर्धेस यशस्वीपणे तोंड द्याल.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : २
टेलिफोन व लाईट बिले भरावी लागणार आहेत काही देणीही चुकवावी लागणार आहेत. हौसमौज करण्यावर मर्यादा येतील.

बातम्या आणखी आहेत...