आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 1 ऑक्टोबर रोजी दिवसाची सुरुवात उत्तर भाद्रपदा नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून आजच्या दिवशी वृद्धी नावाचा योग जुळून येत आहे. यातून 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. तर उर्वरीत 5 राशीच्या लोकांसाठी दिवस काहीसा परिश्रमाचा ठरू शकतो.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार...

मेष : शुभ रंग : भगवा | अंक : ५
आज राशीच्या धनस्थानातील चंद्र धनाची वृद्धीच करेल. गृहिणींना काटकसर करण्याची गरज नाही.

वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : १
तुम्ही आपले आवडते छंद जपण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होईल. अनपेक्षितपणे एखाद्या प्रिय व्यक्तीचा कॉल येईल.

मिथुन : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
मनसोक्त खर्च केलात तरी आज पैशाची कमतरता भासणार नाही. काहीजण सहकुटुंब प्रवासाचा आनंद घेणार आहेत. गृहिणी मौल्यवान खरेदी करतील.

कर्क : शुभ रंग : सोनेरी| अंक : ४
प्रचंड उत्साहात आजच्या दिवसाची सुरुवात होणार आहे. जोडीदारास आज एखादे सरप्राइझ गिफ्ट द्याल.

सिंह : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
आज नोकरीत वरिष्ठांकडून काहीसे दडपण जाणवेल. आपल्या कामाव्यतिरीक्त फार खोलात शिरू नका.

कन्या : शुभ रंग : निळा|अंक : ७
व्यावसायिक मंडळींची पैशाची आवक चांगली असेल. अर्धवट उपक्रम नव्यानेे सुरू करता येतील.

तूळ : शुभ रंग : हिरवा|अंक : २
मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकलले तर बरे होईल. आज वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीस थारा नको.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८
व्यावसायिक अडचणींवर जिद्दीने मात कराल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला मोलाचा असेल.

धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९
व्यावसायिक चढ-उतारांचा सामना करावाच लागेल. आज काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील.

मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
आर्थिक आवक चांगली राहील. मुलांच्या वाढत्या मागण्या हौशीने पुरवाल. त्यांच्या शिस्तीकडेही लक्ष द्या.

कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ३
मनोबल व आत्मविश्वास वाढेल. पूर्वीच्या कष्टांची फळे दृष्टिक्षेपात येतील. यथाशक्ती दानधर्म कराल.

मीन : शुभ रंग : मरून | अंक : २
सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. आज कुवतीबाहेर जबाबदाऱ्या मात्र स्वीकारू नका. व्यसने टाळावीत.