आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुरुवार, 11 फेब्रुवारी रोजी दिवसाची सुरुवात श्रवण नक्षत्रामध्ये होत आहे. या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून वरियान नावाचा अशुभ योग येत आहे. या योगाच्या प्रभावातून 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस काहीसा परिश्रमाचा ठरेल. व्यवहार विचारपूर्वक करावे. तसेच कुठल्याही स्वरुपाचे वाद टाळलेलेच बरे...
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील गुरुवार...
मेष: शुभ रंग: पांढरा| अंक : ८
उद्योग व्यवसायात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. देवधर्माकडे कल वाढेल. प्रवास होईल.
वृषभ: शुभ रंग: डाळिंबी| अंक : ९
कार्यक्षेत्रात विरोधकांचा जोर वाढलेला आहे. नोकरीच्या ठिकाणी हाताखालच्या लोकांशी जुळवून घ्यावे लागेल. आर्थिक नुकसान होईल.
मिथून : शुभ रंग : क्रीम| अंक : ७
व्यवसायात मागण्या पूर्ण करण्यासाठी कामाचे तास वाढवणे गरजेचे. आज आवक जावक सेम सेमच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील.
कर्क : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
महत्त्वाच्या चर्चा, विवाहविषयक बोलणी टाळा. पोटाची दुखणी असतील तर दुर्लक्ष करू नका.
सिंह :शुभ रंग : गुलाबी|अंक : ६
आज बरेच दिवसांनी तुम्हाला आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. गृहिणी सौंदर्याची काळजी घेतील.
कन्या : शुभ रंग : आकाशी|अंक : १
काहींचा चक्क ऑफिसला दांडी मारून घरी विश्रांतीचा मूड असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व पटेल.
तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ३
रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. आज दुनियादारी सोडा व फक्त स्वत:पुरते बघा.
वृश्चिक : शुभ रंग : निळा| अंक : २
तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. हातात पैसा खेळता असल्याने मनाजोगता खर्च करता येईल.
धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ४
पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. हट्ट पूर्ण झाल्याने गृहलक्ष्मी व मुले समाधानी असतील.
मकर : शुभ रंग : राखाडी| अंक : ६
काही जणांना आज सहकुटुंब दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. काही लांबचे नातलग संपर्कात येतील.
कुंभ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ३
व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. मित्रांना पार्टी देण्यासाठी आज मनापासून खर्च कराल. मस्त दिवस.
मीन : शुभ रंग : चंदेरी| अंक : १
व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालावा लागेल.घरात वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल. अधिकार वापरण्याची वेळ येईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.