आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे जाणून घ्या तुमच्या राशीनुसार असा राहील आजचा दिवस

गुरुवार, 18 मार्च रोजी भरणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून आज वैधृती नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावातून 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस काहीसा परिश्रमाचा ठरू शकतो. तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरेल.

येथे जाणून घ्या तुमच्या राशीनुसार असा राहील आजचा दिवस

मेष: शुभ रंग : चॉकलेटी | अंक : ३
नोकरीच्या ठीकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर होणार आहेत. आज तुमची कामातील निष्ठा व समर्पण वरीष्ठांना प्रभावित करेल.

वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : ४
आज स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. देण्याघेण्याच्या व्यवहारात फसवणूक.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८
आज नोकरीत वरीष्ठ गोड बोलून राबवून घेणार अाहेत. वडीलधाऱ्या मंडळींची मते विचारात घेणे गरजेचे आहे.

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : २
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज सरकार दरबारी कामे रखडणार आहेत. दानधर्म कराल.

सिंह : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९
कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. घरी जोडीदाराच्याही भावना समजून घेणे हिताचे आहे.

कन्या : शुभ रंग : तांबडा|अंक : ७
आज काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील.वैवाहीक जिवनांत संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील.

तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ६
आज स्वत:चे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. रागाऊन निघून गेलेल्या व्यक्ती दुपारनंतर घरी परत येतील.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
येणी असतील तर वसूल होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.

धनू : शुभ रंग : जांभळा | अंक : ५
विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. नेते मंडळींची लोकप्रियता वाढेल. नेतृत्व गाजवाल.

मकर : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ३
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.

कुंभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : १
आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असले तरी पुरेसा पैसाही उपलब्ध होणार आहे.

मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २
कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी चालून येतील.

बातम्या आणखी आहेत...