आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा गुरुवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 20 ऑगस्ट रोजी सूर्योदय पूर्वा नक्षत्रामध्ये होत आहे. आजच्या दिवशी होणाऱ्या ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून शिव हा योग आणि शुक्ल द्वितिया हा तिथी जुळून येत आहे. ग्रह आणि योगाच्या प्रभावातून आजचा दिवस 12 पैकी 8 राशीच्या लोकांसासाठी शुभ राहील. तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील.

येथे जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य

मेष: शुभ रंग : मरून | अंक : ६

कार्यक्षेत्रात आपले महत्व सिध्द करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक जिवनांत तुमच्या शब्दाला मान राहील. कामाच्या व्यापात तब्येतीकडे दुर्लक्ष होईल.

वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : ४

आज धनप्राप्तीचे विविध मार्ग खुले होतील. उच्च रहाणी व उच्च विचारसरणी असेच तुमचे धोरण राहील. गोड बोलून स्वार्थ साधून घेणे तुम्हाला छान जमेल.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : १

वाहन खरेदीसाठी कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. प्रॉपर्टी विषयी रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील. प्रेम प्रकरणात नसती अाफत होईल.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७

काम कमी व धावपळच जास्त होईल. महत्वाची कामे रेंगाळतील. भिडस्तपणाने न झेेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकाराल. आज आरोग्याबाबत निष्काळजीपणा नको.

सिंह : शुभ रंग : लाल| अंक : ९

एखाद्या मंगलकार्यात सहभागी व्हाल. घरात पाहूण्यांची वर्दळ वाढेल. गृहलक्ष्मी प्रसन्न असेल. देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. वाणीत मृदुता ठेवा.

कन्या : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८

व्यापार उद्योगात आपल्या कुवती बाहेर आर्थिक उलाढाली नकोत. पारिवारीक जिवनातील काही समस्या सोडवाव्या लागतील. व्यस्त दिवस. वाद टाळा.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५

व्यवसयाची गती संथ राहील. सर्वच आर्थिक व्यवहार सावधतेने करणे गरजेचे आहे. विश्वासातल्या माणसाकडूनच विश्वासघात होण्याची शक्यता आहेे.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ६

पूर्वी केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. नोकरीधंद्यातील अनुकूलता वाढेल. दुरावलेले नातेसंबंध जवळ येतील. अनपेक्षित लाभ होतील.

धनू : शुभ रंग : निळा | अंक : ३

कोणत्याही क्षेत्रात असलात तरी काही चढाओढीचा सामना करावाच लागेल. जुन्या अनुभवींचे सल्ले उपयुक्त ठरतील. कार्यक्षेत्रात मानसन्मान वाढेल.

मकर : शुभ रंग : सोनेरी | अंक : २

काही क्षुल्लक अडचणी मन:स्वास्थ्य बिघडवतील. घरात वडीलधाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल.आज भावना व कर्तव्य याचा ताळमेळ साधणे कठीण जाईल.

कुंभ : शुभ रंग : लाल | अंक : ४

कार्यक्षेातील वाढत्या व्यस्ततेमुळे घराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. कदाचित जोडीदाराची नाराजी पत्करावी लागेल. मोहापासून दूर रहा, प्रतिष्ठेस जपा.

मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : १

महत्वाच्या चर्चा व बैठकी यशस्वी होतील. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भांडणातही यशस्वी मध्यस्ती करू शकाल. वैवाहीक जोडीदाराशी छान सूर जुळतील. मस्त दिवस.

बातम्या आणखी आहेत...