आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुमच्यासाठी असा राहील आजचा दिवस

गुरुवार, 28 जानेवारी रोजी दिवसाची सुरुवात पुष्य नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून आज प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. आजच्या दिवशी काहींच्या बाबतीत कौटुंबिकदृष्ट्या समाधानाचा दिवस ठरेल. आर्थिक बाजू उत्तम राहील तसेच काही प्रमाणात खरेदी सुद्धा केली जाऊ शकते. तर काहींना आज खूप महत्वाचे निर्णय सावध राहूनच घ्यावे लागणार आहेत.

तुमच्यासाठी असा राहील आजचा दिवस

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ६
कोणत्याही नवीन कामास प्रारंभ आज नको. मोठे सौदे टाळा. गर्भवती महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.

वृषभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
आज जिवलग मित्र दिलेले शब्द पाळणार आहेत. कौटुंबिक जीवन समाधानी राहील. मोठ्या लोकांच्या ओळखी अडचणीच्या प्रसंगी कामी येतील.

मिथुन : शुभ रंग : निळा| अंक : ५
हट्टीपणास लगाम घालणे गरजेचे. इतरांचे विचार ऐकून घ्या. महत्त्वाचे निर्णय घाईगर्दीत घेऊ नका. कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकणे गरजेचे आहे.

कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ९
काही कौटुंबिक प्रश्न तुम्हाला चिंताग्रस्त करतील. परंतु जोडीदाराच्या खंबीर सहकार्याने त्यावर मात कराल.

सिंह : शुभ रंग : डाळिंबी|अंक : ७
आर्थिक बाजू उत्तम असेल. घरसजावटीच्या शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल. मुलांना दिलेले शब्द पाळाल.

कन्या : शुभ रंग : हिरवा|अंक : ५
घरात काहीतरी कारणाने वडीलधाऱ्यांंशी मतभेद होऊ शकतात. आज प्रवासात काही हितसंबंध जुळतील.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ८
कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे. तुम्ही सहज घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : १
आज तुम्ही खूपच आनंदी व उत्साही असाल. एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल.

धनू : शुभ रंग : मरून| अंक : २
आज काही मोठे खर्च दार ठोठावणार आहेत. आध्यात्मिक मार्गाकडे आज तुमचा कल राहील.

मकर : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होतील. काही भाग्यवान मंडळींना नव्या घराचा ताबा मिळू शकेल.

कुंभ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ५
अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत.आज मित्रमंडळींबरोबर मात्र काहीतरी बिनसणार आहे.

मीन : शुभ रंग : क्रीम| अंक : ४
आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्या मागे धावूच नका.

बातम्या आणखी आहेत...