आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा गुरुवार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राशीनुसार असा राहील आजचा दिवस

गुरुवार, 5 नोव्हेंबर रोजी सूर्योदय आर्द्रा आहोरात्र नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावातून आज शिव नावाचा एक योग जुळून येत आहे. आजचा दिवस 12 पैकी 5 राशींसाठी शुभ राहील. तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.

राशीनुसार असा राहील आजचा दिवस

मेष: शुभ रंग : लाल| अंक : ८
आज घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे गरजेचे आहे. तुमची काही गुपिते उघड होतील. कमीच बोला.

वृषभ: शुभ रंग : डाळिंबी| अंक : ७
पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल. भावंडांमधे मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे.

मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक :९
अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान ठेवता येतील. आज योग्य माणसे संपर्कात येतील.काही महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल.

कर्क : शुभ रंग : आकाशी| अंक :६
आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल.

सिंह :शुभ रंग : मरून|अंक : ३
तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. हौशी मंडळींना चैन करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल.

कन्या : शुभ रंग : हिरवा|अंक : ५
नोकरदार मंडळी वरीष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालावे लागणार आहे.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
शासकिय कामे रखडतील. श्रध्दाळू गृहीणींचा देवधर्म चालूच राहील. आज देवही नवसाला नक्की पावेल.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
शारिरीक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे. मोठे आर्थिक व्यवहार टाळाच.

धनु : शुभ रंग : राखाडी| अंक : १
व्यवसायात तुम्ही वाढत्या स्पर्धेचा सामना करायला समर्थ असाल. जोडीदाराची भक्कम साथ राहील.

मकर : शुभ रंग : निळा| अंक : २
दैनंदीन कामात काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील.

कुंभ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस .

मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ५
आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस असून तुम्ही आज कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.मुलांचे लाड पुरवाल.

बातम्या आणखी आहेत...