आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येथे जाणून घ्या, असा राहील तुमचा आजचा दिवस

बुधवार, 17 मार्च रोजी दिवसाची सुरुवात अश्विनी नक्षत्रामध्ये होत असून आजच्या दिवशी ऐंद्र नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावातून काहींच्या बाबतीत दिवस यशदायी ठरेल. केलेल्या प्रयत्नांना शंभर टक्के यश मिळेल. तर काहींच्या बाबतीत घाईमध्ये घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात.

येथे जाणून घ्या, असा राहील तुमचा आजचा दिवस

मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३
इतरांच्या भानगडीत न पडता फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित करूनच कार्यक्षेत्रात उद्दिष्टे साध्य करू शकाल.

वृषभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ४
पत-प्रतिष्ठा वाढेल. आज आप्तस्वकीयांत तुमच्या शब्दास मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. यशदायी दिवस. दिवसाच्या उत्तरार्धात धनलाभ.

मिथुन : शुभ रंग : क्रीम| अंक : ५
इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण ठेवा. कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील. तुमच्या कामातील उत्साहाने सहकारी प्रभावित होतील.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
अति आक्रमकतेने घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते.

सिंह : शुभ रंग : आकाशी|अंक : ९
आज तुम्हाला काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून मृगजळामागे धावणे योग्य ठरणार नाही.

कन्या : शुभ रंग : भगवा|अंक : ८
आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. अाज तुम्ही आपल्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणार आहात.

तूळ : शुभ रंग : गुलाबी| अंक : २
ध्येय साध्य करण्यासाठी काबाडकष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपून राेजगार मिळेल.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदित कलाकारांना संधी मिळेल. रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल.

धनू : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. मतभेद विसरून भावंडे एकत्र येतील. गृहसौख्याचा दिवस.

मकर : शुभ रंग : मरून| अंक : ५
महत्त्वाच्या चर्चेत इतरांची मते समजून घ्या. आपलेच खरे करण्याचा अट्टहास नको. दिवस थोडा दगदगीचा.

कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
सामाजिक कार्यात तुमचं योगदान द्याल. व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. नवे उपक्रम बिनधास्त सुरू करा.

मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
योग्य माणसे संपर्कात येतील. अथक परिश्रमांच्या साहाय्याने यश दृष्टिक्षेपात येईल. प्रामाणिक प्रयत्नास यश शंभर टक्के मिळेल.

बातम्या आणखी आहेत...