आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 18 ऑगस्ट रोजी सूर्योदय मूळ नक्षत्रामध्ये होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या परिस्थितीतून आज विष्कंभ नावाचा योग जुळत आहे. या योगाच्या प्रभावातून 12 पैकी 4 राशीच्या लोकांसाठी दिवस काहीसा मेहनतीचा ठरू शकतो. तर उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा ठरेल.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

मेष : शुभ रंग : गुलाबी | अंक : २
आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुद्ध गोष्टींनीही राग अनावर होईल.

वृषभ : शुभ रंग : मरून | अंक : ७
अनपेक्षित धनप्राप्ती होईल. क्षुल्लक गैरसमजामुळे दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. छान दिवस.

मिथुन : शुभ रंग : मोतिया| अंक : ५
पैशाअभावी रखडलेल्या योजना मार्गस्थ होतील. आज कार्यक्षेत्रात श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.

कर्क : शुभ रंग : निळा| अंक : ४
कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. थोड्याफार आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६
खर्चिक वृत्तीमुळे पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. कौटुंबिक स्तरावर आनंदी घटना घडतील.

कन्या : शुभ रंग : पांढरा | अंक : ८
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. आवक मुबलक राहील.

तूळ : शुभ रंग : तांबडा| अंक : २
खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता भासणार नाही. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
दैनंदिन कामे वेळेवर होतील. काही भाग्यवंतांची वास्तूविषयक स्वप्ने साकार होतील. आनंदी दिवस.

धनू : शुभ रंग : जांभळा| अंक : ९
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकांचा जोर आता कमी होणार आहे.

मकर : शुभ रंग : पांढरा| अंक : १
व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करून चालणार नाही. सरकारी कामात विलंब होईल.

कुंभ : शुभ रंग : क्रीम| अंक : ८
उद्योग-धंद्यात तीव्र स्पर्धा असेल. झटपट लाभाचा मोह टाळावा. पत्नीच्या हो ला हो करून विषय संपवा.

मीन : शुभ रंग : हिरवा| अंक : ३
नोकरदारांना साहेबांच्या तसेच घरात पत्नीच्याही लहरी सांभाळाव्या लागतील. दिलेले शब्द पाळावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...