आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शनीचा प्रभाव:मिथुन-तूळ राशीवर शनीची ढय्या, धनु, मकर आणि कुंभ राशीवर राहील साडेसाती

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2021 मध्ये शनि करणार नाही राशी परिवर्तन, 23 मे रोजी वक्री होईल हा ग्रह

नऊ ग्रहांमधील एक शनि यावर्षी राशी परिवर्तन करणार नाही. वर्षभर हा ग्रह मकर राशीतच राहील. 23 मे रोजी शनि वक्री होईल आणि 11 ऑक्टोबरला पुन्हा मार्गी होईल. वक्री शनि म्हणजे उलटा चालू लागेल आणि मार्गी म्हणजे सरळ चालेल.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार मकर राशीमध्ये शनि असल्यामुळे मिथुन आणि तूळ राशीवर ढय्या राहील. धनु, मकर आणि कुंभ राशीवर शनीची साडेसाती राहील. ढय्या आणि साडेसातीच्या स्थितीमध्ये काही लोकांना कठीण काळाचा सामना करावा लागू शकतो. शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी प्रत्येक शनिवारी तेलाचे दान करावे आणि शं शनैश्चराय नम: मंत्राचा जप करावा.

मिथुन आणि तूळ राशीवर ढय्याचा प्रभाव : या दोन्ही राशींनी विशेष सावधिगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवर क्रोध करण्यापासून दूर राहावे अन्यथा पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना अधिकाऱ्यांची मदत मिळेल परंतु खूप कष्ट केल्यानंतरच सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकतात.

धनु, मकर आणि कुंभ राशीवर साडेसातीचा प्रभाव : धनु राशीसाठी शनीच्या साडेसातीची शेवटची अडीच वर्ष चालू आहेत. या लोकांना शनीमुळे लाभ होऊ शकतो. जुन्या अडचणी या वर्षी समाप्त होऊ शकतात. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. मकर राशीवर साडेसातीचा दुसरा ढय्या सुरु आहे. यांच्यासाठी हा काळ सामान्य राहील. विचारपूर्वक काम केल्यास लाभही होऊ शकतो. कुंभ राशीवर साडेसातीची पहिली ढय्या सुरु आहे. या राशीच्या लोकांनी सावध राहून काम करणे आवश्यक आहे. नोकरीमध्ये सहकाऱ्यांची पूर्ण मदत मिळणार नाही.

बातम्या आणखी आहेत...