आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेंगशुई वास्तू:क्रिस्टल बॉल्स नकारात्मक ऊर्जा नष्ट करून प्रदान करतात सकारात्मक ऊर्जा 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे रंगीबेरंगी बॉल्स वाढवू शकतात तुमच्या कुटुंबातील सुख-शांती

फेंगशुईमध्ये रंगीबेरंगी क्रिस्टल्स बॉल्सला अत्यंत खास मानले जाते. हे योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी ठेवल्यास कुटुंबातील विविध अडचणी नष्ट होऊ शकतात. हे क्रिस्टल बॉल्स आर्थिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जातात. मान्यतेनुसार क्रिस्टल बॉल्स जवळपासची नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात.

1.

फेंगशुईमध्ये रंगीबेरंगी क्रिस्टल बॉल्स, रंगीत नसलेले क्रिस्टल बॉल्स आणि काळ्या क्रिस्टल बॉल्सविषयी सांगण्यात आले आहे. आज अंतही तुम्हला रंगीबेरंगी क्रिस्टल बॉल्सविषयी सांगत आहोत.

2.

फेंगशुईनुसार घरामध्ये क्रिस्टल बॉल्स ठेवल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली राहते. सुख वाढते.

3.

क्रिस्टल बॉल्स जवळपासची नकारात्मक ऊर्जा ग्रहण करून घेतात. यामुळे घरातील लोकांचे विचार सकारात्मक बनतात.

4. घरामध्ये अशांती आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव असल्यास लिव्हिंग किंवा ड्रॉईंग रूममध्ये क्रिस्टल बॉल ठेवावा. यामुळे सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकतील.

5

. तुमची इच्छा असल्यास तुम्ही विंड चाइममध्ये 3-4 क्रिस्टल बॉल्स लावून ठेवू शकता. परंतु अशाप्रकारची विंड चाइम आपल्या बेडरूममध्ये किंवा स्टडी रूममध्ये लावू नये.

6

. व्यापार ठीक चालत नसेल तर एक रंगीबेरंगी क्रिस्टल बॉल ऑफिसच्या उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावा. व्यापारासाठी ही दिशा सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे. हे क्रिस्टल बॉल या दिशेचा दोष दूर करेल.

7

. पती-पत्नीमध्ये तणाव असल्यास बेडरूममध्ये क्रिस्टल बॉल ठेवावा. हा बॉल दिवसातून कमीत कमी 3 वेळेस अवश्य फिरवावा.

8.

मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसल्यास स्टडी रूममध्ये एक क्रिस्टल बॉल ठेवावा. याच्या प्रभावाने मुलांची एकाग्रता वाढू शकते.

बातम्या आणखी आहेत...