आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य :जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार 

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आहे आठवड्यातील पहिल्या दिवसाची सुरुवात

सोमवार 22 जून 2020 रोजी आद्रा नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी आणि इतर मोठ्या लोकांची कामामध्ये मदत मिळेल. मोठे काम पूर्ण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...


मेष: शुभ रंग : भगवा | अंक : ४

मनसोक्त खर्च केला तरी पैशाची कमतरता भासणार नाही. काही जण सहकुटुंब प्रवासाचा आनंद घेतील.


वृषभ: शुभ रंग : चंदेरी | अंक : १

कामाचा व्याप, अति महत्त्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. शेजाऱ्यांशी क्षुल्लक मतभेद होण्याची शक्यता आहे.


मिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २

कार्यक्षेत्रात पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. नोकरदारांना वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. दैवाची साथ आहेच. आज पत्नी महत्त्वपूर्ण सल्ले देणार आहे.


कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५

आपल्या मर्यादा सांभाळा.कुसंगतीपासून लांब राहा. नीतीबाह्य वर्तन आंगाशी येईल.


सिंह : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७

कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग सहज सोडवू शकाल. काही मनासारख्या घटना तुमची उमेद वाढवतील.


कन्या : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६

आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत राहाल. आज इतरांचे विचार पटणार नाहीत. अधिकार गाजवाल.


तूळ : शुभ रंग : क्रिम | अंक : ८

नोकरदारांवर कामाचा प्रचंड ताण राहील. कार्यक्षेत्रात काही मनाविरुध्द घटना घडल्याने नैराश्य येईल


वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : ५

नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकीनऊ येतील. काही अनपेक्षित घटना मन:शांती बिघडवतील.


धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६

चर्चेत वेळ फुकट जाईल. महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. प्रवासात खोळंबा होऊ शकताे.


मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : ९

मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात विरोधकांचा विरोध वाढण्याची शक्यता.


कुंभ : शुभ रंग : भगवा | अंक : ४

आज चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. छान दिवस.


मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. त्याचप्रमाणे खर्चाचेही विविध मार्ग खुणावतील. गृहिणींचे गृहोद्योग तेजीत चालतील. 

0