आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य :जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

3 महिन्यांपूर्वीलेखक: पं. जयंत कुळकर्णी
  • कॉपी लिंक
  • शुक्ल नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

शनिवार, 18 एप्रिलला चैत्र मासातील एकादशी तिथी आहे. यासोबतच आज शतभिषा नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची कामामध्ये मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

  • मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : १

चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. उच्चशिक्षितांना  मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. छान दिवस.

  • वृषभ: शुभ रंग : अबोली | अंक : ३

अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरुच राहील. नोकरदारांना वरीष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील. व्यस्त दिवस.

  • मिथुन : शुभ रंग : निळा | अंक : ६

नोकरदारांवर कामाचा प्रचंड ताण राहील. कार्यक्षेत्रात काही मनाविरूध्द घटना घडल्याने नैराश्य येईल. आज वरीष्ठांशी नमते घ्या व सहकाऱ्यांशी जुळवून घ्या. 

  • कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ४

हौसमौज जरूर करा पण आपल्या मर्यादा सांभाळा.कुसंगतीपासून लांबच रहा. नितीबाह्य वर्तन आंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे राहील. 

  • सिंह : शुभ रंग : मोतिया | अंक : ३

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग सहजच सोडवू शकाल. वैवाहीक जिवनांत लाडीक रुसवे फुगवे असतील.

  • कन्या : शुभ रंग : सोनेरी | अंक : २

काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. पथ्यपाणी नाही पाळलेत तर आजार बळावण्याची शक्यता अाहे. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.

  • तूळ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी नको. महत्वाच्या कामास विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच रहाणार आहे. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसेल. 

  • वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९

वास्तू, वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील.कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमांचे फळ दृष्टीक्षेपात येईल. कला, क्रिडा क्षेत्रातील मंडळींनी प्रयत्न वाढववेत. 

  • धनू : शुभ रंग : भगवा | अंक : १

परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. आज जमिन जुमल्याच्या व्यवहारात सावध रहाणे गरजेचे आहे.

  • मकर : शुभ रंग : मोतिया | अंक : ७

अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. त्याचप्रमाणे खर्चाचेही विविध मार्ग खुणावतील. गृहीणींना विविध जाहीराती भुरळ घालतील. आज पायपीट होईल. 

  • कुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९

आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. अती आत्मविश्वासाने नुकसान होईल. तब्येतीवर वाईट परीणाम होईल.

  • मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ५

रिकामटेकडया चर्चेत व वादविवादात वेळ फुकट जाईल. महत्वाची कामे दुर्लक्षित होतील. आज काही आवश्यक खरेदी कराल. मुलांचे हट्ट पुरवाल.

0