आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • ठीक नाहीत शनिवारचे ग्रह नक्षत्र

शनिवार 16 मे रोजी वैधृती आणि काळदंड नावाचे दोन अशुभ योग जुळून येत आहेत. यामुळे काही लोकांसाठी आजचा दिवस तणावाचा राहील. कामामध्ये मन लागणार नाही आणि नुकसानही होऊ शकते. आजच्या ग्रहस्थितीनुसार 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील...
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

 • मेष: शुभ रंग : केशरी | अंक : २

आज दिवस लाभाचा. एखाद्या चांगल्या बातमीने दिवसाची सुरवात होईल. धंद्यातील रखडलेली उधारी वसूल होईल. संततीचे विवाहयोग जुळून येतील.

 • वृषभ : शुभ रंग : स्ट्रॅबेरी | अंक : ५

तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर मात्र महागात पडेल. सामंजस्याचे धोरण हिताचे राहील.

 • मिथुन : शुभ रंग : जांभळा | अंक : ६

नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. वरिष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. कोणतेही कौटुंबिक निर्णय वडीलधाऱ्यांच्या संगनमताने घ्यावे लागतील.

 • कर्क : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९

कार्यक्षेत्रातील काही मनाविरुद्ध घटना तुम्हाला बेचैन करतील. आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच..

 • सिंह : शुभ रंग : मरून | अंक : ३

खर्च योग्य कारणांसाठी होईल. काही दुरावलेली नाती जवळ येतील. वैवाहिक जीवनात आज दाेघांत तिसऱ्याला प्रवेश देऊच नका.

 • कन्या : शुभ रंग : मोतिया | अंक : ४

वादविवादात तुम्ही स्वत:चेच घोडे पुढे दामटवाल.आर्थिक व्यवहारात मात्र सावध राहणे गरजेचे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका.

 • तूळ : शुभ रंग : आकाशी | अंक : ३

सौंदर्य प्रसाधने, चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. ऐशआरामी वृत्ती बळावेल. गृहिणी आज ब्यूटी पार्लरसाठी आवर्जून वेळ काढतील. छान दिवस.

 • वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २

भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील.

 • धनू : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ७

आर्थिक आवक पुरेशी असून अाज परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखादी अडचण शेजाऱ्यांच्या मदतीने दूर होईल. मुले आज्ञा पाळतील.

 • मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : १

हौसमौज करण्यासाठी सढळ हस्ते खर्च करू शकाल. तुमची जीवनशैली उंचावेल. उद्योगधंद्यातील उद्दिष्टे आज सहज साध्य होणार आहेत.

 • कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : २

व्यावसायिकांनी आपली आर्थिक क्षमता ओळखूनच उलाढाली कराव्यात. अति आक्रमकता काहीच कामाची नाही. जीवनात जोडीदाराचे मन जपाल.

 • मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : १

आज मौजमस्तीस तुमचे प्राधान्य राहील. मुलांचे हट्ट पुरवाल. व्यावसायिकांना गुंतवणुकीच्या नव्या संधी आकर्षित करतील. मुलांच्या आराेग्यास जपा.

बातम्या आणखी आहेत...