आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील रविवार

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 12 मार्च रोजी स्वाती नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या 6 राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष: शुभ रंग:निळा, शुभ अंक : १
आज कौटुंबिक सदस्यांत सुसंवाद असेल. तुम्ही आज कार्यक्षेत्रातही तुमचे महत्व सिध्द करू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.

वृषभ: शुभ रंग:पिस्ता, शुभ अंक : ९
कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

मिथुन : शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : ८
हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल.आज मनसोक्त स्वत:चे लाड पुरवण्यासाठी पैसा खर्च कराल. कलाकार मंडळी प्रसिध्दीच्या झोतात राहतील.

कर्क : शुभ रंग:लेमन, शुभ अंक : ६
कामावर दांडी मारून घरी मस्त आराम करायचा आज तुमचा मूड असेल. काही घरगुती प्रश्नांत लक्ष घालणे गरजेचे वाटेल. गृहीणी मुलांच्या अभ्यासात लक्ष देतील.

सिंह : शुभ रंग: हिरवा, शुभ अंक : 2
शेजाऱ्यांशी क्षुल्लक कारणाने झालेले गैरसमज दूर होऊन सलोखा वाढेल. काहीजणांना अचानक जवळपासचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. क्रोधावर लगाम ठेवा.

कन्या : शुभ रंग:डाळिंबी, शुभ अंक : ५
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस, मनी योजाल ते तडीस न्याल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडू शकेल. आज जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील.

तूळ : शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ३
वाढत्या खर्चातही पैशाची आज कमतरता भासणार नाही. आज कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्व गुणांना चांगला वाव मिळेल. आज वक्त्याची भाषणे प्रभावी होतील.

वृश्चिक : शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ४
आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको.संध्याकाळी एखाद्या मॉलमधे फेरफटका माराल. उंची वस्त्रखरेदी कराल. आज गरजेपुरते आध्यात्मिक व्हाल.

धनू : शुभ रंग:मरून, शुभ अंक : १
जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. अती उत्साहात आज काही चूकीचे निर्णय घ्याल.
विवाहेच्छूकांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील.

मकर : शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : ४
आज ऑफिसमधे कामाचा प्रचंड ताण असणार आहे.कामाच्या व्यापात घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. आज कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. व्यस्त दिवस.

कुंभ : शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ७
आज दैवाचे पाठबळ उत्तम आल्याने. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगा. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. सज्जनांचा सहवास लाभेल.

मीन : शुभ रंग आकाशी, शुभ अंक : ९
हितशत्रू कदाचित मित्रांमधेच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. सावध रहा. आज कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेऊ नका.

बातम्या आणखी आहेत...