आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • आज चैत्र मासातील पौर्णिमा तिथी तसेच हनुमान जयंतीचा खास योग

आज बुधवार 8 एप्रिल 2020 रोजी चित्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आज चैत्र मासातील पौर्णिमा तिथी असून हनुमान जयंतीसुद्धा आहे. आज जुळून आलेल्या हा शुभ योगाचा 12 राशींवर खास प्रभाव राहील. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. बिझनेस आणि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी आज  समजू शकते. 12 पै 7 राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत खास राहिल.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

  • मेष: शुभ रंग : क्रिम | अंक : ४

अथक प्रयत्नांच्या जोरावर आज तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरु राहील. महत्वाच्या वाटाघाटी, विवाह विषयी चर्चेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

  • वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ५

आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. विवाह जुळवण्याविषयी बोलणी उद्यावर ढकला. आज कोणतेही निर्णय उताविळपणे घेणे योग्य ठरणार नाही.

  • मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : १

आज बरेच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येण्याची शक्यता आहे. कवींना प्रेमगीते सुचतील. गृहीणी पार्लरसाठी वेळ काढतील.

  • कर्क : शुभ रंग : आकाशी | अंक : ९

एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या. आज मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावेे लागेल. 

  • सिंह : शुभ रंग : जांभळा | अंक : ७

आज हातात पैसा राहील. आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. चैनी व विलासी वृत्तीस खतपाणी घालाल. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवा.   

  • कन्या : शुभ रंग : चंदेरी | अंक : ६

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भाराऊन जाल. मस्त दिवस.

  • तूळ : शुभ रंग : केशरी | अंक : ८

अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वडीलधाऱ्यांशी मतभेद होतील पण त्यांच्या वयाचा मान राखाल. कलाकारांचा विदेशी नावलौकिक.

  • वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल. व्यवसायात भिडस्तपणास लगाम घाला.  

  • धनू : शुभ रंग : लेमन | अंक : १

कार्यक्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. आज चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे हिताचे राहील.जे आपल्याला कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका.

  • मकर : शुभ रंग : निळा | अंक : ५

आज रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक करू नका. ववाहीक जिवनांत जोडीदाराच्या मताने घ्या. 

  • कुंभ : शुभ रंग : राखाडी | अंक : २

आज तुम्ही आपल्या मर्यादा ओळखून वागणेच हिताचे राहील. कुणी पाठीवर हात ठेऊन लढ म्हणाले तर लढू नका. आज स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य द्या. 

  • मीन : शुभ रंग :हिरवा| अंक : ४

नोकरीच्या ठीकाणी अधिकारी वर्गाशी नमते घ्यावे. कुटुंबातील सदस्यांना वेळ देण्याचा प्रयत्न. वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल. 

बातम्या आणखी आहेत...