आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शुक्रवार 1 जानेवारी 2021, नवीन वर्षातील पहिल्या दिवसाची सुरुवात पुष्य नक्षत्रामध्ये होत आहे. 1 जानेवारीला ग्रहांची विशेष स्थिती जुळून येत आहे. यामध्ये चंद्र, मंगळ आणि शनि स्वतःच्या राशीत राहतील. या शुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिला दिवस खास राहील. कामातील अडथळे दूर होतील. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...
मेष : शुभ रंग : हिरवा| अंक : ७
आज झालेल्या नव्या ओळखी भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा.
वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ६
विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय योग्य ठरतील. नवकवींच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल. आशादायी दिवस.
मिथुन : शुभ रंग : मोतिया| अंक : ८
आज एखादी गोष्ट फारच मनाला लावून घ्याल.तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका.
कर्क : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ९
बेरोजगारांनी रोजगारासाठी दूरगावी जाण्याची तयारी ठेवावी. आज खर्चाचे प्रमाण आवाक्याबाहेर राहील.
सिंह : शुभ रंग : क्रीम|अंक : ३
प्रतिष्ठितांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. बेरोजगारांना नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील.
कन्या : शुभ रंग : पिस्ता|अंक : ५
कामाचा व्याप, अति महत्त्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. स्वत:साठी वेळ काढणे अशक्य होईल.
तूळ : शुभ रंग : निळा| अंक : २
आज नव्या उपक्रमाची सुरुवात टाळा. आज सज्जनांच्या सहवासात तुमचे मन रमेल. भक्तिमार्गात गोडी वाटेल.
वृश्चिक : शुभ रंग : केशरी| अंक : ४
सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशी अपेक्षा नकाे. वैवाहिक जीवनात थोडी कुरबूर संभवते.
धनू : शुभ रंग : पांढरा| अंक : १
स्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. जोडीदारास वेळ देणे गरजेेचे आहे.
मकर : शुभ रंग : भगवा| अंक : ५
अति श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल. पत्नीच्या चुका काढू नका.
कुंभ : शुभ रंग : तांबडा| अंक : ४
कुटुंंबियांच्या वाढत्या गरजा पुरवाव्या लागतील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. प्रकृती उत्तम साथ देईल.
मीन : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६
धंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील.नवे उपक्रम जोमाने सुरू करता येतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.