आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शुक्रवार 11 डिसेंबर 2020 ला चित्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती शोभन नावाचा शुभ योग तयार करत आहे. आजच्या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...
मेष : शुभ रंग : क्रीम| अंक : ६
ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आज पत्नीचे सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत.
वृषभ : शुभ रंग : पांढरा| अंक : १
आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. तब्येतीच्या बाबतीत पैशाची काटकसर करून चालणार नाही. विश्रांतीस प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.
मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ४
घरात शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील.नवे कलाकार व खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येतील.
कर्क : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
आनंदी व उत्साही असा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. परिवारास पुरेसा वेळ द्याल.
सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ३
नकळत झालेल्या चुकींमुळे नुकसान सोसावे लागेल. मुले आज अभ्यास सोडून सर्व काही करणार आहेत.
कन्या : शुभ रंग : मरून| अंक : २
आज मित्रपरिवारात तुमचा शब्द अंतिम राहील. पण भावनेच्या भरात मात्र कुणाला शब्द देऊच नका.
तूळ : शुभ रंग : निळा|अंक : ७
व्यवसायात स्पर्धेचा सामना करण्यासाठी तयार असाल. अडचणीत पत्नीची भक्कम साथ राहील.
वृश्चिक : शुभ रंग : जांभळा|अंक : ९
कंजूषपणा कामाचा नाही. काही अत्यावश्यक खर्च करावेच लागतील. कर्जाचे हप्ते भरावे लागतील.
धनू : शुभ रंग : चंदेरी| अंक : १
मोठ्या लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. संततीकडून आज काही सुवार्ता येतील.
मकर : शुभ रंग : राखाडी|अंक : ४
नोकरीत जास्त वेळ थांबून कामे करावी लागतील. आज रिकाम्या प्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.
कुंभ : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९
शासकीय कामे रखडणार आहेत. गृहिणींचा अाज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.
मीन : शुभ रंग : केशरी| अंक : ८
आज स्वावलंबन महत्त्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या नात्यांमध्ये मतभेद संभवतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.