आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशुभ योगामध्ये दिवसाची होत आहे सुरुवात

शुक्रवार 12 जून 2020 ला शतभिषा नक्षत्र असल्यामुळे विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. 12 पैकी सहा राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा ठरू शकतो. या अशुभ प्रभावामुळे लोकांचा मूड खराब होईल आणि चिडचिड वाढू शकते. यासोबतच कामे वेळेवर पुर्ण होणार नाहीत. राशीच्या ग्रह स्थितीनुसार लोक कोणत्या ना कोणत्या अडचणीत अडकू शकतात. याव्यतिरिक्त अन्य ग्रहांचा मिळता जुळता परिणाम राहिल. सहा राशींसाठी दिवस ठीकठाक राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : ४

नोकरीच्या ठीकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर होतील. आज अनुकूल दिवस 

वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : ९

रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. सरकार दरबारी रखडलेली काही कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

मिथुन : शुभ रंग : तांबूस | अंक : ९

नोकरीत वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. घरातील वडीलधाऱ्या मंडळींची मते विचारात घेणे गरजेचे आहे.

कर्क :  शुभ रंग : पांढरा | अंक : ३

व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६

नोकरीच्या ठीकाणी अधिकारी वर्गाची आपल्यावर मर्जी आहेच या भ्रमात राहू नका. सहकाऱ्यांशी जुळवून घ्या.

कन्या : शुभ रंग : राखाडी | अंक : ८

आर्थिक स्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. ज्येष्ठांनी प्रकृतीची पथ्ये पाळावीत

तूळ : शुभ रंग : क्रिम | अंक : २

नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी येतील. कलाकार व खेळाडूंची प्रसिध्दीची हौस भागेल. 

वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ७

आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. 

धनू :  शुभ रंग : आकाशी  | अंक : ३

विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. आज भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागतील.

मकर : शुभ रंग : गुलाबी  | अंक : १

काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असतील. तरीही पुरेसा पैसाही उपलब्ध होणार आहे. 

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४

आज स्वत:चे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल.

मीन : शुभ रंग : मरून | अंक : २

सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा.आज स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही.  

बातम्या आणखी आहेत...