आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

आजचे राशिभविष्य / जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार शुक्रवार 15 मे रोजी धनिष्ठा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजचे ग्रह-तारे इंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावामुळे बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगांचा फायदा विशेषतः 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. याव्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

 • मेष: शुभ रंग : भगवा | अंक : १ आज लाभाचा दिवस असून उत्पन्नाचे विवध मार्ग दिसून येतील. पूर्वीच्या कष्टांचे फळ दृष्टिक्षेपात येईल. दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येणार आहेत.
 • वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ९ कार्यक्षेत्रात नवी आव्हाने सकारात्मकतेने स्वीकाराल.आपले काम सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागू शकते.
 • मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : २
 • कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ६ आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. वैवाहिक जीवनात किरकोळ वाद संभवतात, पण फार ताणून धरू नका. सासुरवाडीकडून लाभ संभवतो.
 • सिंह : शुभ रंग : आकाशी | अंक : ४ व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील.आज जोडीदारास दिलेले शब्द पाळणे हिताचे राहील.
 • कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३ हट्टीपणा सोडून संयमाने वागण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात स्पर्धकांवर सहजपणे मात करू शकाल. जोडीदाराच्या चुका काढायची चूक करू नका.
 • तूळ : शुभ रंग : अबोली | अंक : १ पतप्रतिष्ठा वाढेल. आज आप्तस्वकीयात तुमच्या शब्दास मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. हितशत्रू पळवाट शोधतील. आजचा दिवस यशदायी.
 • वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ६ जागेसंबंधित महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागतील.वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल. गृहसैख्य लाभेल.
 • धनू : शुभ रंग : सोनेरी | अंक : ५

आज संमिश्र फळे देणारा दिवस असून आवक -जावक समान राहील. शब्द जपून वापरल्यास वाद टाळता येतील. थोरामोठ्यांंच्या वयाचा मान राखा.

 • मकर : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८

नवीन झालेले परिचय फायदेशीर ठरतील. आज तुम्हाला परिवारासाठी वेळ देणे कठीण जाईल. सामाजिक कामे करणाऱ्यांना लोकांचा आदर मिळेल.

 • कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : ७

आज स्वत:ची. हौसमौज पुरवण्यासाठी सढळ हस्ते पैसे खर्च कराल. जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवाल. कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील.

 • मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ९

काही जणांना प्रवासास निघावे लागेल. गृहिणींना क्षणभरही उसंत मिळणे कठीण अाहे. जमाखर्चाचा मेळ बसवणे अवघड जाईल. व्यग्र दिवस.

बातम्या आणखी आहेत...