आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 17 सप्टेंबर रोजी श्रवण नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे अतिगंड नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस अडचणींचा राहील. या लोकांनी नोकरी आणि बिझनेसच्या ठिकाणी सावध राहावे. अशुभ योगाच्या प्रभावाने नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष: शुभ रंग : भगवा | अंक : ७
सहजच काही साध्य होईल असा विचारच करू नका. सरकारी कामात विलंब ठरलेलाच आहे. घरात वडीलधाऱ्यांच्याही लहरी सांभाळाव्या लागतील.

वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : ९
जिवलग मित्रांमधेही आज काही वैचारीक मतभेद होणार आहेत. अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येणार आहे. स्वावलंबनास प्राधान्य देणे गरजेचे आहे.

मिथुन : शुभ रंग : राखाडी | अंक : ५
बऱ्याच दिवसांपासूनची काही अपूरी स्वप्ने साकार होऊ शकतील. कर्जप्रस्ताव मंजूर होतील. आज शुभ चिंता, जे मागाल त्याला देव तथास्तू म्हणणार आहे.

कर्क : शुभ रंग : आकाशी | अंक : १
हाती असलेला पैसा जपून वापरणे गरजेचे. आज काही मोठे खर्च दार ठोठावतील. रात्रीच्या प्रवसात जागेच राहीलेले बरे. आज तुम्ही काही गरजूंच्या कामी याल.

सिंह : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३
आज तुमचा अधुनिक राहणीमानाकडे कल राहील. आपल्या कार्यक्षेत्रात आघाडीवर रहाल. आज घरात व बाहेर कुठेही आपलेच खरे करण्याचा अट्टहास टाळा.

कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : २
व्यवसायात भागिदारांशी सलोख्याचे संबंध राहतील.वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस.

तूळ : शुभ रंग : मरून| अंक : ४
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरूणांनी व्यसनांपासून दूर रहाणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी. नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक रहाणे गरजेचे आहे.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८
रखडलेले उपक्रम सुरु करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. नव्याने चालून आलेल्या संधींचे सोने कराल.गृहीणींना आज काटकसर करण्याची अवश्यकता नाही.

धनू : शुभ रंग : अबोली | अंक : ३
आज जमेची बाजू जड राहील. घर सजावटीसाठी मौल्यवान चीजवस्तूंची खरेदी कराल. आज जरा मुलांच्या शिस्तीकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५
नोकरीच्या ठीकाणी कामाचा ताण जाणवेल. जर वरीष्ठांच्या मर्जीत रहायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत. दिवस कष्टांचा.

कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ७
अत्यंत उत्साही व आनंदी दिवस. तुमच्या महत्वाकांक्षा व अपेक्षाही वाढणार आहेत. एखाद्या नव्या विषयाची आवड निर्माण होईल. मुले मन लाऊन अभ्यास करतील.

मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकू शकतात. आजच झालेल्या नव्या ओळखींवर चुकूनही विश्वास ठेऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्याचा प्रयत्न नको.

बातम्या आणखी आहेत...