आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 18 डिसेंबर रोजी श्रवण नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या 6 राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...

मेष : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ७
नोकरीच्या ठिकाणी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्या. नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी.

वृषभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ९
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. आज फक्त कष्ट करीत राहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा.

मिथुन : शुभ रंग : मरून| अंक : ८
नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. काही गोडबोली माणसे भेटतील. झटपट लाभाचा मोह टाळणेच हिताचे. कामापुरतेच बोला.

कर्क : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
आज सभा-संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल. आनंदी दिवस.

सिंह : शुभ रंग : पांढरा| अंक : ४
नोकरीत कंटाळवाणी कामे करावी लागतील. साहेबांचे समाधान केवळ अशक्य. शारीरिक थकवा जाणवेल.

कन्या : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
कर्तव्यापेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल. चंगळवादी वृत्ती राहील. जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल.

तूळ : शुभ रंग : भगवा| अंक : ३
प्राॅपर्टीसंबंधी अपुरे व्यवहार मार्गी लागतील. आज विद्यार्थ्यांकडून काहीतरी कौतुकास्पद कामगिरी होईल.

वृश्चिक : शुभ रंग : मोतिया| अंक : १
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागेल. जुनी तत्त्वे गुंडाळून ठेवावी लागतील. कामाचे तासही वाढवावेत.

धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ९
अति धावपळ टाळा. हार्ड वर् पेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील.

मकर : शुभ रंग : राखाडी|अंक : २
प्रकृती ठणठणीत असल्याने तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल.

कुंभ : शुभ रंग : आकाशी|अंक : ४
आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. अनावश्यक खर्चास तत्काळ ब्रेक गरजेचा आहे.

मीन : शुभ रंग : निळा| अंक : ७
आज तुमचे मनोबल उत्तम राहील. काही अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. आप्तस्वकीयात मान मिळेल.

बातम्या आणखी आहेत...