आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 18 मार्च रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 6 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...

मेष : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
काही मनाजोगत्या घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृध्दी होईल. ज्येष्ठांनी प्रकृतीची काळजी घ्यायला हवी.

वृषभ : शुभ रंग : सोनेरी | अंक : १
जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना आज अभ्यासात गोडी वाटेल. आईचे मन सांभाळा.

मिथुन : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. आईचेे सल्ले योग्यच असतील.

कर्क : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८
आर्थिक सुबत्ता येईल. मृदु वाणीने विरोधकांना आपलेसे कराल. आज शेजारी सलोखा राहील.

सिंह : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
कार्यक्षेत्रात सन्मान वाढेल. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. अनपेक्षित लाभ मनाला दिलासा देतील.

कन्या : शुभ रंग : पांढरा | अंक : ६
आज कंजूषपणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. बचतीचा विचार नको.

तूळ : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
मनाच्या लहरीपणास आवर घालणे गरजेचे. अती महत्वाकांक्षांना ब्रेक लाऊन तब्येतीवरही लक्ष द्यावे.

वृश्चिक : शुभ रंग : निळा| अंक : ५
कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही पुरेपुर राहील. तब्येत उत्तम असून तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील.

धनु : शुभ रंग : क्रिम| अंक : १
व्यावसायिक महत्वाचे करार आज दिवसाच्या उत्तरार्धात कराल तर बरे. अधिकार जपून वापरा.

मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
अनोळखी व्यक्तींवर चुकुनही विश्वास ठेऊ नका. आज ताकही फुंकून प्यावे असा दिवस. सतर्क रहा.

कुंभ : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
आज क्षुल्लक कारणाने चिडचिड होईल. तरूणांनी गैरवर्तन टाळावे. प्रेमप्रकरणे मनस्तापच देतील.

मीन : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग धावपळच जास्त होईल. थकवा जाणवेल.

बातम्या आणखी आहेत...