आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 2 ऑक्टोबर रोजी रेवती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार...

मेष : शुभ रंग : केशरी| अंक : १
दिवस धावपळीत जाईल. काही अनावश्यक खर्चही कराल. काहींना आज दूरचे प्रवास घडू शकतील.

वृषभ : शुभ रंग : मरून| अंक : ७
कार्यक्षेत्रात पूर्वीच्या श्रमांची फळे दृष्टिक्षेपात येतील. आज तुमच्या विरोधकांनाही तुमची मते पटू लागल्याचे तुमच्या लक्षात येईल. स्पप्नपूर्ती होईल.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
वेळेचे योग्य नियोजन केल्याने दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आपल्या अधिकारांचा योग्य प्रकारे वापर करून कार्यक्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित कराल.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५
क्षुल्लक कामातही अडचणी येतील. शासकीय कामे खोळंबतील. नास्तिक मंडळीही देवाला नवस बोलतील.

सिंह : शुभ रंग : मारपंखी|अंक : १
नवीन व्यावसायिक असाल तर आज मर्यादेबाहेर आर्थिक धाडस करू नका. कामगारांनी सुरक्षेस प्राधान्य द्यावे.

कन्या : शुभ रंग : गुलाबी|अंक : २
कार्यक्षेत्रातील स्पर्धेचा सामना करण्यास सज्ज असाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ असेल.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : राखाडी|अंक : ५
धंद्यात येणी वसूल झाल्याने व्यापाऱ्यांचा उत्साह वाढेल. महत्त्वाकांक्षांच्या मागे धावताना प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी|अंक : ३
मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील.

धनु : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७
कष्टांचाही अतिरेक नकाे. आज हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क हिताचे राहील. आज मातोश्रींचे मन मोडू नका.

मकर : शुभ रंग : निळा| अंक : ८
काही जणांना घर दुरुस्तीच्या कामात लक्ष घालावे लागेल. मुले आज अभ्यासात चालढकल करतील.

कुंभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ९
पुष्कळ दिवसांनी काही प्रिय पाहुण्यांचे आगमन होईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्याच मुद्यावर अडून राहाल.

मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ६
आज एखादी गोष्ट फारच मनाला लावून घ्याल.तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील.

बातम्या आणखी आहेत...