आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज शनि जयंती आणि शोभन नावाचा शुभ योग, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील शुक्रवार

शुक्रवार 22 मे 2020 ला कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती शोभन नावाचा शुभ योग तयार करत आहे. यासोबतच आज जेष्ठ मासातील अमावास्या तिथी  असून शनि जयंती आहे. आजच्या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : ३

हातात पैसा राहील. आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करू शकाल. चैनी व विलासी वृत्तीस खतपाणी घालाल.

वृषभ: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६

आज रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मताने घ्या.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : २

अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वडीलधाऱ्यांशी मतभेद होतील, पण त्यांच्या वयाचा मान राखाल.

कर्क : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १

व्यापारी वर्गाची बाजारात पत वाढेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भारावून जाल. मस्त दिवस.

सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होऊ शकते. शब्दास मान द्यावा लागेल.

कन्या : शुभ रंग : अबोली | अंक : ५

कार्यक्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. ज्यात कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका.

तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : ६

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी नमते घ्यावे लागेल.वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल.

वृश्चिक : शुभ रंग : केशरी | अंक : ४

अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल. विवाहविषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील.

धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ८

आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. कोणतेही निर्णय उतावीळपणे घेणे योग्य नाही.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५

एखादा नवा विषय शिकण्याची संधी मिळेल. कवी प्रेमगीते लिहितील. गृहिणी सौंदर्याची काळजी घेतील.

कुंभ : शुभ रंग : भगवा | अंक : ७

अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या. आज मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावेे लागेल.

मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९

आपल्या मर्यादा ओळखून वागणेच हिताचे राहील. कुटुंबातील सदस्यांची नाराजी पत्करावी लागेल.

बातम्या आणखी आहेत...